मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व स्तरावर विविध उपाययोजना सुरू असून नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची प्रकृती नाजूक असल्यास इस्पितळात यावे, असे आवाहन मुंबईतल्या टाटा कर्करोग रुग्णालयाने केले आहे. देशभरातून टाटा रुग्णालयात रुग्ण येत असतात, त्याचबरोबर अनेक चाचण्याही येथे केल्या जातात. मात्र, गेले काही दिवस मुंबईत ही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन रुग्णालयाने केले आहे.
रुग्णांची स्थिती नाजुक असल्यास रुग्णालयात यावे; टाटा कर्करोग रुग्णालयाचे आवाहन - corona update
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व स्तरावर विविध उपाययोजना सुरू असून नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्णांची प्रकृती नाजूक असल्यास इस्पितळात यावे, असे आवाहन मुंबईतल्या टाटा कर्करोग रुग्णालयाने केले आहे.
हेही वाचा -Coronavirus : भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, राज्यात 39 जण आढळले
दरम्यान, टाटा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना नियमितपणे सेवा दिली जाईल, त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही असेही रुग्णालयाच्या पत्रकात करण्यात आले आहे. रुग्णांच्या अधिक माहितीसाठी टाटा रुग्णालयाने ०२२-२४१७७००० हा हेल्प लाईन क्रमांकही दिला आहे. तसेच अधिक माहिती करीता https://tmc.gov.in/index.php/en/ या संकेत स्थळावर रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधता येणार आहे.