मुंबई : 'शिक्षण आणि शैक्षणिक गुणवत्ता ही देशाची आणि राज्याची ओळख असते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजोपयोगी शिक्षण दिले पाहिजे' ( Along with education confidence important ) असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केले.मुंबई विद्यापीठ येथे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन' या विषयावरील एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते.
Chandrakant Patil : विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करा - चंद्रकांत पाटील
मुंबई विद्यापीठ येथे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन' या विषयावरील एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुरूप शिक्षणाबरोबरच त्यांचा आत्मविश्वास आणि आत्मगौरव वाढवणारे आणि त्यांना प्रगल्भ करणारे समाजोपयोगी शिक्षण दिले पाहिजे' ( Along with education confidence important ) असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
नॅक मूल्यांकन करून घेणे गरजेचे : राज्यातील महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करून घेणे गरजेचे आहे. नॅक मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयाच्या काही अडचणी असल्यास शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. परंतु नॅक मूल्यांकनामध्ये मागे राहू नये, नॅक मूल्यांकन ऐच्छिक नसून ती एक अनिवार्य गरज आहे हे लक्षात घेऊन महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रिया लवकर सुरू करावी,असे आवाहनही पाटील ( Higher and Technical Education Minister Chandrakant Patil ) यांनी केले. उच्च शिक्षणातील प्राध्यापक भरती संदर्भात चिंता व्यक्त केली (Teacher recruitment ) गेली.त्यावर प्रतिक्रिया देताना मंत्री पाटील म्हणाले,"प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असून २ हजार ८८ पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली ( Teacher recruitment in stages ) आहे. याबाबची रोस्टर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून उर्वरित पद भरती बाबतही आढावा घेऊन टप्याटप्यांनी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल".
शिक्षण मातृभाषेत असावे :नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण मातृभाषेत असावे याला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विखुरलेल्या उच्च व तंत्र शिक्षण संस्थापासून बहूशाखीय विद्यापीठांची रचना ही काळाची गरज आहे. नवीन शैक्षणिक बदल स्वीकारून विद्यार्थांना अत्याधुनिक सुविधा देऊन प्रगत अभ्यासक्रमाच्या साहाय्याने प्रशिक्षण,संशोधन,आणि समुदायाप्रती प्रतिबध्दता हे शिक्षण संस्थांचे स्वरूप असले पाहिजे.ह्यावर शासन ठाम आल्याची ग्वाही ह्या कार्यक्रमात शासनाने दिली.या परिषदेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, नॅकचे चेअरमन भूषण पटवर्धन, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अजय भामरे, रुसाचे संचालक निपुण विनायक, उच्च शिक्षण संचालक धनराज माने, प्र कुलगुरू दिगंबर शिर्के, कुलसचिव शैलेंद्र देवळणकर, विभागप्रमुख, प्राध्यापक आणि मान्यवर उपस्थित होते.