महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Crime : गर्लफ्रेंडसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्याची चाकूने भोकसून हत्या, दोघांना अटक - mumbai news

मुंबईतील चुनाभट्टी परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गुरुवारी सायंकाळी वर्दळीच्या रस्त्यावर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष 6 ने सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून दोघांना अटक केली आहे.

Mumbai Crime
गर्लफ्रेंडसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्याची चाकूने भोकसून हत्या

By

Published : Feb 4, 2023, 7:25 AM IST

मुंबई :दोन तरुणांनी गुरुवारी (२ जानेवारी) सायंकाळी 6.30 च्या सुमारास विद्यार्थ्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून पळ काढला. मुद्दसीर मुख्तार शेख असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो चेंबूर परिसरातील रहिवासी आहे. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी विद्यार्थ्याला गंभीर जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मुद्दसीर शेख मुंबईतील चुनाभट्टी परिसरात असलेल्या कॉलेजमधून घरी परतत असताना ही घटना घडली. पोलिसांना या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणाचा अँगल समोर आला आहे. आरोपींपैकी एकाने ज्या मुलीवर आधी प्रेम केले होते, ती मुलगी मुद्दसीर शेखच्या प्रेमात पडली, त्यामुळे आरोपीने त्याच्या मित्रासह ही घटना घडवून आणली असा प्राथमिक अंदार पोलिसांनी व्यक्त केला आहे.

गर्लफ्रेंडसाठी खून :मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट-6 ने 19 वर्षीय विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी दोन फरार आरोपींना अटक केली आहे. चुनाभट्टी पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३०२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मुद्दसिर मुख्तार शेख, वय १९ वर्षे हा सिंधी पोलीस चौकीच्या दिशेने रोडने पायी चालत जात असताना दोन आरोपींनी अ‍ॅक्टिवा मोटार सायकलवरून येवून त्यांच्याकडील धारदार शस्त्राने त्याच्या पोटावर, छातीवर, डोक्यावर सपासप वार केले. याप्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही फुटेजचा वापर : गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष ६ व कक्ष ७ यांना या गुन्हयाची माहिती प्राप्त होताच समांतर तपास करीत होते. अनोळखी आरोपीताबाबत काही एक माहिती नसताना घटनास्थळाच्या रोडवर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून स्कूटर मोटार सायकलवर दोन इसम संशयितरित्या फिरताना दिसून आले. या इसमांबाबत गोपनिय बातमीदारांकडून माहिती घेतली असता एक तरुण इसम अंदाजे वय १९ वर्षे आणि दुसरा तरुण इसम अंदाजे वय २० वर्षे अशी असल्याची माहिती मिळाली. या इसमांचे राहत्या घराची माहिती मिळाल्यानुसार त्यांच्या राहते घरी तसेच परिसरात कक्ष ६ च्या पथकाने कसून शोध घेतला.



तीन वेगवेगळ्या पथकांची निर्मीती : आरोपी इसमांचा मोबाईल बंद येत असल्यामुळे तपास करताना प्रथमतः काही एक माहिती मिळून येत नव्हती. वरिष्ठांच्या परवानगीने कक्ष ६ ची तीन वेगवेगळी पथके तयार केली. त्यामध्ये कक्ष ७ चे प्रभारी पोलीस निरीक्षक तावडे, पोलीस उपनिरीक्षक रामदास कदम यांचा सहभाग होता. तीन पोलीस पथके कल्याण, शिवाजीनगर, गोवंडी, देवनार, चुनाभट्टी या परिसरात आरोपींचा शोध घेत होते. कक्ष ६ चे पथकाकडून गोपनीय माहिती काढून सोशल मिडीयाद्वारे अधिक माहिती घेवून मिळालेल्या माहितीचे वैज्ञानिकदृष्टया विश्लेषण केल्यानंतर अथक परीश्रमाअंती आरोपी इसम हे धारावी, मुंबई परीसरात लपून बसल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.

हेही वाचा :Satara Crime : प्रेम प्रकरणातून मित्राने साथीदारांच्या मदतीने केली तरुणाची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details