मुंबई Cocaine Caught in Mumbai : केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी एकूण चार प्रकरणांत मिळून मुंबई विमानतळ तसंच मुंबईतील एका घरातून मिळून सुमारे 70 कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलं. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नैरोबी इथून कोकेनची तस्करी : सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नैरोबी येथून प्रामुख्यानं या कोकेनची तस्करी झालीय. यापैकी नैरोबी येथून आलेलं कोकेन मुंबईत विरार इथं वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीच्या घरातून जप्त करण्यात आलंय. तर, दोन प्रकरणांमध्ये प्रवाशांनी आपल्या बॅगमध्ये बनावट कप्पे तयार करुन त्यात हे कोकेन लपविण्यात आलं होतं. तिसऱ्या प्रकरणात एका व्यक्तीनं कोकेन दडविलेल्या कॅप्सूल गिळल्या होत्या. त्यालाही अटक करण्यात आली असून त्याला उपचासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या एकत्रित कोकेनचं वजन ७ किलो इतके आहे.
यापूर्वी अनेक प्रकरणांचा पर्दाफाश : डीआरआयच्या अधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई इथं वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून अंमली पदार्थ कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटच्या वाहकांकडून अंमली पदार्थांची तस्करी करण्याच्या अनेक प्रयत्नांचा यापूर्वी पर्दाफाश केलाय. ड्रग्सच्या विळख्यातून समाजाचं रक्षण करण्यासाठी ड्रग सिंडिकेटची नवीन मोडस ऑपरेंडी शोधून काढण्यासाठी अंमलबजावणी एजन्सी म्हणून डीआरआयचं अतुलनीय समर्पण आणि व्यावसायिकता दर्शवतं. मागील काही दिवसांपासून मुंबईतील विमानतळावर कोकेन तसंच इतर प्रकारचे ड्रग्ज सापडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालाय. या पार्श्वभूमीवर डीआरआयकडून ही कारवाई करण्यात आल्यानं ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
हेही वाचा :
- Gold Smuggling Case Mumbai: 'डीआरआय'ने सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा केला पर्दाफाश, ७ किलो सोने जप्त
- Gold Smuggling : DRI ची मोठी कारवाई; मुंबईसह वाराणसी, नागपूर येथून 19 कोटींचं सोनं जप्त
- Drug Racket Caught In Mumbai : 'एनसीबी'ने इंटरनॅशनल ड्रग्ज रॅकेटचा केला पर्दाफाश, 9 जणांना अटक