मुंबई - बँकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी लोकांच्या गरजेनुसार, युवा पिढीचा अधिक सहभाग बँकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा तसेच सहकारी बँकांच्या कामकाजात देखील बदल करत स्वतःचे भांडवल उभे करावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. प्रभादेवी महाराष्ट्र कला अकादमी रवींद्र नाट्य मंदिर येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबई यांचा 24 वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
सहकारी बँकांनी नवीन बदल स्वीकारून स्वतःचे भांडवल उभे करावे - उपमुख्यमंत्री हेही वाचा - कोरोनाचा भारतीय औषधी उद्योगावर परिणाम होण्याची भीती
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अर्बन बँक जिल्हा बँकांकडे नवीन येण्याचे प्रमाण कमी आहे. नवीन पिढीच्या गरजा लक्षात घेत बँकांनी कामकाजात बदल करून युवापिढीला सभासद म्हणून बँकांच्या संचालक मंडळात स्थान दिले पाहिजे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना तत्काळ सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. सहकारी बँकांनी नवीन बदल स्वीकारून कामकाजात मूलभूत बदल करीत स्वतःचे भांडवल उभे करावे. तसेच बँक अडचणीत येणार नाही याचा विचार संचालक मंडळाने करावा. बँकांच्या अडचणीच्या संदर्भात त्यातील कर्मचाऱ्यांनी शासनाला याबाबत जसे होईल तसे कळवावे शासन सकारात्मक राहील असे पवार यांनी सांगितले.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. समाज माध्यमांवरून बँकिंग क्षेत्राशी संबंधित चुकीचे संदेश दूरध्वनी येतात. यापासून बँका आणि ग्राहक सतर्क राहवे. राज्यातील सायबर सेल हा देशातील सर्वाधिक अद्यावत आहे. अडचणीच्या काळात यांचीही मदत बँकांनी घ्यावी. नियमानुसार वसुली करण्यात अडचणी असतील तर त्यासाठी पोलिस संरक्षण संदर्भात सहकार्य करण्यात येईल असे देशमुख म्हणाले.
तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी असोसिएशनचा महत्त्वाचा सहभाग आहे. बँकांनी वाढते सायबर गुन्हे लक्षात घेऊन त्यापासून सावध राहत, आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना देणे आवश्यक आहे. सहकार क्षेत्र अधिक समृद्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, सहकारातून जनतेला उत्तम सेवा दिली पाहिजे असे पाटील यांनी या कार्यक्रमावेळी म्हणाले.
कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे, बँकेचे कार्याध्यक्ष मुकुंद करमळकर, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर आणि बँकांचे संचालक कर्मचारी उपस्थित होते. या यावेळी सन 2019-20 बँक पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण देखील करण्यात आले.
हेही वाचा - आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल - गृहराज्यमंत्री