मुंबईतील सीएनजी गॅस तुटवड्याचा रिक्षाचालकांना फटका - मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा विस्कळीत
उरणच्या गॅस प्रकल्पातून मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडला सीएनजीचा पुरवठा केला जातो. शुक्रवारी सांयकाळी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा शुक्रवारपासून विस्कळीत झाला आहे. याचा परिणाम रिक्षा चालकांच्या व्यवसायावरही झाला आहे.
![मुंबईतील सीएनजी गॅस तुटवड्याचा रिक्षाचालकांना फटका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4164427-thumbnail-3x2-cng.jpg)
मुंबईतील सीएनजी गॅस तुटवड्याचा रिक्षाचालकांना फटका
मुंबई -उरण येथील ओएनजीसी गॅस प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईतील सीएनजी गॅस पुरवठा शुक्रवारपासून विस्कळीत झाला आहे. याचा फटका चेंबूरमधील रिक्षाचालकांनाही बसला आहे. सीएनजी केंद्रावर लवकर गॅस मिळत नसल्याने याचा रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालकांना 100 रुपये जास्त मोजावे लागत आहेत.
मुंबईतील सीएनजी गॅस तुटवड्याचा रिक्षाचालकांना फटका