महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रविवारी मुख्यमंत्री साधणार राज्यातील डॉक्टरांशी संवाद; कोरोना परिस्थितीबाबत करणार चर्चा - latest online program on Corona conditions

रविवार १६मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर या क्रार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील मार्गदर्शन करणार आहेत.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : May 15, 2021, 5:34 PM IST

मुंबई- कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या डॉक्टरांना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी मुंबईतील सुमारे एक हजार डॉक्टरांशी संवाद साधला होता. उद्या रविवार १६मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील वैद्यकीय चिकित्सकांसाठी सोशल मीडियावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर या क्रार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील मार्गदर्शन करणार आहेत.

मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे डॉक्टरांना आवाहन
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोनावर उपचार या विषयावर महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी आणि डॉ. राहुल पंडित संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम OneMDच्या फेसबुक https://www.facebook.com/100441008205176/posts/304013491181259/ आणि यूट्यूब चॅनेल https://youtu.be/7dH0X0FTCpc वर उद्या रविवार १६ तारखेस दुपारी १२ वाजता पहायला मिळेल. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मीडियावरून देखील याचे प्रसारण करण्यात येईल. या ऑनलाइन कार्यक्रमात डॉक्टरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कोरोना लढाईला अधिक बळ देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details