मुंबई- लॉकडाऊन नंतर अनलॉक करताच राज्य सरकारने १६ हजार कोटी रुपये गुंतवणूकीसाठी करार केले आहेत. महाराष्ट्र हे आपले घरच आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या दृष्टीने 'मेड इन इंडिया' तर आहेच. पण महाराष्ट्राचे देखील एक वैशिष्ट्य असावे. एखादी वस्तू, उत्पादन हे 'मेड इन महाराष्ट्र' असावे, याठिकाणी उत्पादने सुरू व्हावीत. प्रत्येक उद्योगपतींनी त्यांच्या मनातले किमान एक एक प्रकल्प आमच्याकडे घेऊन यावेत. आम्ही या प्रकल्पांना तातडीने सुरू करण्याची कार्यवाही करू, झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्रासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी उद्योगपतींना दिली.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्योगपतींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या वातावरणातही उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक करावीशी वाटते आहे हे फार महत्वाचे आहे. अशा सर्व उद्योग आणि गुंतवणूकदारांचे आम्ही स्वागतच करू. उत्पादने सुरू व्हावीत यासाठी आम्ही पुढे जाणार असून प्रत्येक उद्योगपतींनी त्यांच्या मनातले किमान एक एक प्रकल्प आमच्याकडे घेऊन यावेत. आम्ही या प्रकल्पांना तातडीने सुरू करण्याची कार्यवाही करू, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
जिथे शक्य आहे तिथे वर्क फ्रॉम होम ही कार्यपद्धती आपल्याला कायमस्वरुपी अवलंबता येईल, जेणेकरुन कोरोना नंतरच्या काळातले आपले जीवन सुरक्षित आणि व्यवस्थित राहील हेही आपल्याला पहावे लागेल. मुंबईत ५० टक्के लोक झोपड्यांत राहतात. माझ्या वडिलांनी एकेकाळी या झोपडीधारकाला घर देण्याचे स्वप्न पाहिले होते. निश्चितच आमच्यासाठी या कोरोना नंतरच्या काळात हा प्राधान्याचा विषय राहील, असे मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना सांगितले.
"मेड इन महाराष्ट्र'साठी उद्योगपतींनी मनातले प्रकल्प आणावेत"- मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे मुंबई बातमी
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उद्योगपतींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई देखील उपस्थित होते.
धारावीसारख्या झोपडपट्टीत कोरोनामुळे काय हाहाकार माजेल असे वाटले होते. पण आम्ही खुप प्रयत्न केले आणि संसर्ग रोखला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कामही आमच्या प्राधान्यक्रमात आहे. येणाऱ्या काळात ऑनलाईन व्यवहारांचे आणि एकूणच दूरसंचारला येणारे खूप जास्त महत्व लक्षात घेता राज्यात सर्वदूर दर्जेदार आणि गतिमान नेटवर्कचे जाळे उभारण्यात येईल. सध्या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना देखील काही अडचणी असतील तर त्या दूर करणे तसेच या क्षेत्रांची परिस्थिती चांगली करण्यावर भर दिला जाईल.
महाराष्ट्रात काम करणारे परराज्यातील मजूर, कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. आम्ही त्यांना जा म्हणून सांगितले नाही. पण आता महाराष्ट्रात आम्ही कमाला सुरुवात केली आहे, उद्योगही सुरू झाले आहेत. राज्याच्या अगदी कानाकोपऱ्यात आम्ही जाहिराती देऊन मनुष्यबळ उलब्ध होईल, आणि येथील लोकांना नोकऱ्या देऊन कामे थांबणार नाहीत असे पाहू.
कृषीवर आधारित उद्योग, शीतगृह साखळी, शेतमालाचे विपणन यासारख्या गोष्टींना देखील प्राधान्य दिले जाईल. सीआयआय यांनी विद्यापीठाचा प्रस्ताव तयार केला आहे, तो त्यांनी लवकरात लवकर सादर करावा, आम्ही त्यावर निर्णय घेऊ. प्रत्येक उद्योगपतींनी किमान एक तरी प्रकल्प आणावा, तातडीने कार्यवाही करू, असे उद्धव ठाकरे यांनी शेवटी सांगितले. ऑनलाइन बैठकीचे सुनील माथुर यांनी सूत्रसंचालन केले. तर हर्ष गोयंका, जमशेद गोदरेज , नौशाद फोर्ब्स, थियागराजन यांनी आपले विचार मांडले.