महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवाळीचा आनंद घ्या, मात्र कोरोनाचे नियम पाळून - मुख्यमंत्री ठाकरेंचे नागरिकांना आवाहन - mumbai uddhav thakre corona news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर, सणाचा आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनाचे संकट टळले नसल्याने नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा करावा. दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर, रुग्णसंख्या बेसुमार वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

cm appeal on diwali celebration
मुख्यमंत्री ठाकरे दिवाळी आवाहन

By

Published : Nov 11, 2020, 2:21 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर, सणाचा आनंद घ्या, पण आरोग्याच्या जबाबदारीचे भान ठेवा, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. आपण स्वत: देखील केवळ सोशल मीडिया, ईमेलद्वारे शुभेच्छा स्वीकारणार असून भेटीगाठी न करता अतिशय सुरक्षितपणे, घरीच सण साजरा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनाचे संकट टळले नसल्याने नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा करावा. दिवाळीत आपण बेसावध राहिलो तर, रुग्णसंख्या बेसुमार वाढेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना योद्ध्यांना विसरू नका
एकीकडे दिवाळीचा आनंद आपण घेणार असलो तरी, दुसरीकडे डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस हे सणवार विसरून कोरोनाशी लढत आहेत. त्यांची दिवाळी रुग्णालयांमध्ये आणि कर्तव्य बजावताना जाणार आहे. त्यांच्यावरचा ताण वाढू न देणे आणि घरातच राहून सुरक्षतरित्या दिवाळी साजरी करणे याला प्राधान्य देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
घरातच सण साजरा करूया
आपल्याला दिवाळीनंतर शाळा, महाविद्यालये सुरू करायची आहेत. पूर्ववत आयुष्य जगायचे आहे. फटाके वाजवणे आणि बाहेरच्या भेटीगाठी यापेक्षा घरातच कुटुंब एकत्रितरीत्या हा सण साजरा करू शकते. हा दीपोत्सव असल्याने दिव्यांची आरास, रांगोळ्या, ज्यांना शक्य आहे त्यांना अंगणात किल्ले करणे, या काळात सुट्या असल्याने वाचन करणे, संगीत तसेच इतर आवड पूर्ण करा. तुमच्या घराचे दरवाजे मंगलमय शांती, समृद्धी, लक्ष्मीसाठी उघडा, कोरोनासारख्या रोगासाठी नव्हे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details