मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर कुठेही खड्डे नाहीत, तर जे असतील ते मेट्रोमुळे असतील, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सामना या दैनिकाला दिलेल्या या मुलाखतीत ते बोलत होते. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.
मुख्यमंत्री उवाच; म्हणाले... 'मुंबईतील रस्त्यांवर कुठेही खड्डे नाहीत' - cm thackrey interview to saamana
मुंबईतील मोठ्या रस्त्यावंर खड्डे नाहीत असा दावा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सामना या दैनिकाला दिलेल्या या मुलाखतीत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, काही ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यांची अवस्था वाईट आहेत. मात्र, त्याचा आढावा घेतल्यानंतर जाणवले की, या रस्त्यांचे बजेट अत्यंत मोठे आहे. मात्र, तरीसुद्धा एखाद्या विभागातील संपूर्ण रस्ते खराब असतील तर त्यातील प्राथमिकता ठरवून त्यातील एकेका रस्त्याचे काम करण्यात येईल. सर्वच रस्त्यांचे काम एका वेळी करता येणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राज्यातील अनेक गावखेड्यातील, जिल्ह्यातील रस्ते खराब आहेत, या संजय राऊत यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली.
हेही वाचा - 'बुलेट ट्रेन 'त्यांचा' ड्रीम प्रोजेक्ट; मात्र, जाग आल्यावर वस्तुस्थिती समोर येते'