नाशिक -शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण खोटी ठरवावी तसेच जनता आणि न्यायपालिकेचा सुदृढ संबंधासाठी प्रयत्नशील असावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यस्तरीय वकील परिषदेला आज (रविवार) सुरूवात झाली. या परिषदेच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. दोन दिवस ही वकील परिषद चालणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, न्यायदानाचे कार्य अतिशय महत्वाचे कार्य आहे. न्याय सर्वांसाठी समान आहे. तुम्ही राजा असलास तरी न्यायालयात सगळ्यांना सामान न्याय मिळतो. म्हणून यासाठी न्यायदान प्रक्रिया जलद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितलेय. दरम्यान, माझ्यासाठी हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. इतक्या जवळून पहिल्यांदा सरन्यायाधीशांची भेट झाली याचा मला खरोखरच खूप आनंद होत आहे. तसेच आमचे काही चुकत असेल तर आम्हाला सांगा, जनता आहे म्हणून आम्ही आहोत. म्हणून गरज पडल्यास कान पकडा, असे आवाहनही त्यांनी न्यायमुर्तींना केले.