मुंबई - मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना विलगीकरण केंद्र-2 व्यवस्थेची आज पाहणी केली. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल, सहआयुक्त (विशेष) आनंद वागराळकर, पी. दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर, प्रमुख अभियंता विजय पाचपांडे, विशेष कार्य अधिकारी देवेंद्र जैन यावेळी उपस्थित होते.
नेस्कोतील विलगीकरण केंद्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी - जागतिक आरोग्य आणीबाणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नेस्को मैदानावर कोरोना विलगीकरण केंद्र क्रमांक 2 व 3 येथील व्यवस्थेची पाहणी केली. 1 हजार 240 बेड क्षमतेचे हे संपूर्ण केंद्र असेल. येथे ऑक्सिजन पुरवठाही उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखे दिले जातील. येथे पुरेसे वैद्यकीय अधिकारी, परिचारिकाही असतील.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी नेस्को मैदानावर क्रमांक कोरोना विलगीकरण केंद्र 2 व 3 या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची प्रामुख्याने पाहणी केली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना नेस्को केंद्रावर करण्यात येत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.
एकूण 1 हजार 240 बेड क्षमता असलेले हे संपूर्ण केंद्र असणार आहे. याठिकाणी ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिले जाणार आहेत. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार आहेत. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या तयारीबाबत समाधान व्यक्त केले.