महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री ठाकरे सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर; असा आहे दौरा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तीन जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. पाहा कसा असणार आहे मुख्यमंत्र्यांचा हा दौरा...

cm uddhav thackeray tour of satara ratnagiri and pune district
मुख्यमंत्री ठाकरे सातारा, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांच्या दौऱ्यावर, असा आहे दौरा

By

Published : Dec 10, 2020, 6:41 AM IST

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरूवार १० डिसेंबर) सातारा, रत्नागिरी व पुणे जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री कोयनेच्या पोफळी जल विद्युत प्रकल्पाची तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेची पाहणी करतील.

असा आहे मुख्यमंत्री ठाकरे यांचा नियोजित दौरा...

  • सकाळी ९.०५ वाजता जुहू विमानतळ येथून हेलिकॉप्टरने कोयनानगर (ता. पाटण, जि. सातारा) कडे प्रयाण
  • सकाळी १० वाजता कोयनानगर हेलिपॅडवर आगमन व मोटारीने रत्नागिरी जिल्ह्यातील पोफळी जलविद्युत प्रकल्पाकडे प्रयाण
  • सकाळी १०.५० वाजता पोफळी जलविद्युत प्रकल्प कोयना टप्पा ४ विद्युतगृहाची पाहणी
  • सकाळी ११.२० वाजता मोटारीने कोयना धरण (ता. पाटण, जि. सातारा) कडे प्रयाण
  • दुपारी १२.०५ वाजता कोयना धरण येथे आगमन व परिसराची पाहणी
  • दुपारी १२.४० वाजता कोयना विश्रामगृह येथे आगमन व राखीव
  • दुपारी १.१० वाजता मोटारीने कोयनानगर हेलिपॅडकडे प्रयाण व हेलिकॉप्टरने ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) कडे प्रयाण
  • दुपारी २.०० वाजता ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन व मोटारीने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोगदा क्र. २ च्या प्रकल्पस्थळाकडे प्रयाण
  • दुपारी २.२० वाजता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या दरम्यानच्या नवीन मार्गिकेच्या बांधकामाची पाहणी व त्यानंतर मोटारीने प्रकल्पाच्या कॅम्प ऑफिसकडे प्रयाण
  • दुपारी २.५० वा. कॅम्प ऑफिस येथे आगमन व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली-कुसगाव दरम्यानच्या नवीन बांधकामाचे सादरीकरण
  • दुपारी ३.१५ वाजता मोटारीने ओझर्डे (ता. मावळ, जि. पुणे) हेलिपॅडकडे प्रयाण
  • दुपारी ३.३० वाजता ओझर्डे हेलिपॅड येथे आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण

ABOUT THE AUTHOR

...view details