महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ठाकरे सरकारने आपला ठाकरी बाणा दाखवत संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी' - संजय राठोड प्रविण दरेकर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या किंवा हत्या झाली आहे याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात अनेक क्लिप, फोटो दस्तऐवज उपलब्ध आहेत तसेच साक्षीदार उपलब्ध आहेत.

pravin darekar demand
प्रविण दरेकरांची मागणी

By

Published : Feb 26, 2021, 2:52 PM IST

Updated : Feb 26, 2021, 5:11 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपला ठाकरी बाणा दाखवत पूजा चव्हाण मृत्यु प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसेच वनमंत्री राठोड यांनी पीडित पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं. मात्र, पूजाचा मृत्यू कसा झाला? व्हायरल क्लिपची सत्यता काय? याबाबत काहीही भाष्य केलं नाही. त्यांनी सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, अशी टीकाही त्यांनी केली.

याप्रकरणी बोलताना विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

राजीनामा घ्यावाच लागेल -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या किंवा हत्या झाली आहे, याची चौकशी झाली पाहिजे. या संदर्भात अनेक क्लिप, फोटो दस्तऐवज उपलब्ध आहेत तसेच साक्षीदार उपलब्ध आहेत. चौकशी होत नाही म्हणून सरकारवर दबाव टाकण्याचे काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करत आहोत. महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. समाजाच्या दबावाला बळी न पडता एक राज्य शासक म्हणून ठाकरे बाणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखविला पाहिजे आणि संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, असेही दरेकर म्हणाले.

हेही वाचा -मुख्यमंत्री घेणार संजय राठोड यांचा राजीनामा?

दरम्यान, भारतीय जनता पार्टी या प्रकरणाबाबत आक्रमक आहे. पूजा चव्हाण मृत्युचा छडा लागल्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. संशयाची सुई संजय राठोड यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा. निर्दोषत्व सिद्ध झाल्यास मंत्री पदावर संजय राठोड यांना पुन्हा आणावे, अशी स्पष्ट मागणी आम्ही करत असल्याचेही ते म्हणाले.

Last Updated : Feb 26, 2021, 5:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details