मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीवारी झाल्यानंतर लगेच त्यांच्या वर्षा या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधत, सीएए कायद्याबाबत सकारात्मक भूमिका मांडली होती. उद्धव ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत मत-मतांतरे होत आहेत. कारण काँग्रेसने सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्याला जाहीर विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या कायद्यावरुन आघाडीतील सत्ताधारी तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठकीत चर्चा होईल.