महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद : मेट्रो कारशेड आता कांजुरमार्गला ; शेतकरी, आदिवासींचे हित जपणार - Metro car shed news

'आरेला कारशेड बनवण्यासाठी रातोरात झाडे कापली गेली. पर्यावरणवाद्यांना अटक झाली. त्यांच्यावरील गुन्हे महाविकास आघाडी सरकार मागे घेत आहे. आरेची ६०० एकर जागा आमच्या सरकारने जंगल म्हणून घोषित केली आहे. मात्र, तिथे राहाणाऱ्या आदिवासींना याचा धक्का बसणार नाही. जगातील हे एकमेव उदाहरण असेल की, शहरात एवढे मोठे जंगल होईल,' असे मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद
उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

By

Published : Oct 11, 2020, 2:17 PM IST

Updated : Oct 11, 2020, 3:09 PM IST

मुंबई -मागील काही दिवसांपूर्वी आरेतील जागा 'जंगल' म्हणून घोषित केल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. 'विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून आरेचा मुद्दा चर्चेत होता. आरे येथील कारशेडला आमचा तेव्हाही विरोध होता. आरेतील जागा जंगल म्हणून घोषित केले आहे. त्यावेळी 600 एकर जागेची घोषणा केली होती. आता या जागेची व्याप्ती वाढवली असून ते आता 800 एकर असेल. आता मुंबईत 800 एकराचे जंगल असणार आहे. तथापि, आदिवासी आणि स्थानिकांवर कुठलाही अन्याय होणार नाही,' असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचा जनतेशी संवाद

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. 'आरेला कारशेड बनवण्यासाठी रातोरात झाडे कापली गेली. पर्यावरणवाद्यांना अटक झाली. त्यांच्यावरील गुन्हे महाविकास आघाडी सरकार मागे घेत आहे. आरेची ६०० एकर जागा आमच्या सरकारने जंगल म्हणून घोषित केले आहे. जगातील हे एकमेव उदाहरण असेल की, शहरात एवढे मोठे जंगल होईल,' असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा -संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय घडामोडींवर दीड तास चर्चा

कारशेडबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले, 'मेट्रो कारशेड आता आरेऐवजी कांजुरमार्ग येथे होणार आहे. ती जमीन सरकारची आहे. शून्य रुपयांत ही जमीन मेट्रो कारशेडसाठी दिली जाणार आहे. आरेमध्ये उभी राहिलेली बिल्डिंग एका चांगल्या कामासाठी वापरली जाईल. कारशेडसाठी खर्च केलेला पैसा वाया जाऊ दिला जाणार नाही.'

या योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मेट्रोचे अधिकारी यांचे आभारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. भाजपाच्या वृक्षारोपणाचा नामोल्लेख टाळून तशी आमची 'बोलाची कढी' नसेल. आहे ते जंगल आणि वृक्ष वाचवणे, हे प्राथमिक कर्तव्य आहे. ते आम्ही केले आहे, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, निसर्ग चक्रीवादळाने कोकणात झालेल्या नुकसानीची भरपाई सरकार देत आहे.

'पिकेल ते विकेल' असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'ज्या पिकांना हमखास भाव मिळेल अशी पिके घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. साडेएकोणतीस लाख शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ केले आहे. 'महाऑनियन' प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. कांद्यासाठी साठवणूक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच इतर पिकांसाठीही मोठे साठवणूक केंद्र उघडण्यात येतील, असे सांगतानाच, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही,' अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

कोरोना हा एक परदेशी पाहुणा आहे. चीनमधून जगभर पसरला आहे. हा पाहुणा केव्हा जाणार, याचा समाचार घ्यावाच लागेल. लॉकडाऊन हळूहळू उठवले जात आहे. आपली काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा -राज्यात विक्रमी २६ हजारांहून अधिक जणांची कोरोनावर मात; रुग्ण बरे होण्याचा दर ८३ टक्क्यांवर

Last Updated : Oct 11, 2020, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details