महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'उत्तर प्रदेशसारखा प्रकार महाराष्ट्रात होणार नाही, असा दरारा निर्माण करा'

जनतेच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण करतांनाच पोलिसांबद्दलचा निर्माण करा. वाईट कृत्य करतांना पोलिसांचे आपल्यावर लक्ष ठेऊन आहेत, ही भीती प्रत्येकाला वाटली पाहिजे. जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. गुंडागर्दीला आळा घालण्याबरोबरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करा, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लेटेस्ट न्यूज
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लेटेस्ट न्यूज

By

Published : Oct 1, 2020, 6:46 PM IST

मुंबई - 'उत्तर प्रदेश येथील हाथरस एका युवतीवर अत्याचार करण्यात आला. रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या प्रकाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निषेध केला आहे. असा प्रकार महाराष्ट्रात करण्याची कोणाला हिम्मत होता कामा नये असा पोलिसांचा दरारा निर्माण करा,' असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे ई उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले उत्तर प्रदेशमध्ये जे युवतीवर अत्याचार झाले ते सहन होणारे नाहीत. केवळ मीरा-भाईंदर नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणाचीही माझ्या माता-भगिनींवर अत्याचार करण्याचं तर सोडाच पण त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, अशा पद्धतीचा कारभार मीरा-भाईंदरमध्ये झाला पाहिजे.

जनतेच्या मनात पोलिसांविषयी मित्रत्वाची भावना निर्माण करतांनाच पोलिसांबद्दलचा निर्माण करा. वाईट कृत्य करतांना पोलिसांचे आपल्यावर लक्ष ठेऊन आहेत ही भीती प्रत्येकाला वाटली पाहिजे. जनतेचे रक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य आहे. गुंडागर्दीला आळा घालण्याबरोबरच महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करा. आपल्या कर्तव्य कठोर कामगिरीने आदर्श आयुक्तालय म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. शासन आपल्या पाठीशी खंबिरपणे आहे असेही ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा -उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा - अबू आझमी

पोलिसांचे आरोग्यही महत्वाचे -

केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून पोलिसांकडे बघितले जावे. कोरोना काळात त्यांच्या आरोग्याची तसेच कुटुंबीयांची काळजी घेण्यात यावी, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त सदानंद म्हणून दाते सारख्या सक्षम व जिगरबाज अधिकारी देण्यात आला आहे, ते निश्चितच आदर्श कार्य करतील, असा विश्वासही मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांचे ट्विट -

उत्तर प्रदेशमध्ये जे घडले, महिलांवर अत्याचार, हे नाही सहन होणार! केवळ मीरा-भाईंदर नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणाची हिंमत होता कामा नये, की माझ्या माता-भगिनींकडे अत्याचार करण्याचं तर सोडाच. पण वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होता कामा नये, अशा पद्धतीचा कारभार मीरा-भाईंदरमध्ये पाहिजे.

हेही वाचा -आरे वृक्षतोड : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details