मुंबई : स्वातंत्र्यलढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे नाव म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील. आज त्यांची जयंती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोर स्वातंत्र्यसेनानी नाना पाटील यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन - krantisinha Nana Patil birth anniversary news
थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांना सळे की पळो करून सोडणारे नाना पाटील यांची आज जयंती. याबाबद अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, क्रांतिसिंह हा शब्दच ज्यांच्यासाठी असावा असे स्वातंत्र्य सेनानी नाना पाटील होते. त्यांनी प्रतिसरकार स्थापून ब्रिटीश साम्राज्याला हादरा दिला. तरुणांमध्ये क्रांतीचे बीज पेरणारे नाना हे साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचे होते. आयुष्यभर ते मातृभुमीविषयी प्रेम आणि कष्टकऱ्यांबद्दल तळमळ घेऊन जगले. यासाठी त्यांनी प्रसंगी संघर्षही केला. अशा या थोर देशभक्त क्रांतिसिंह नाना पाटील यांना त्रिवार अभिवादन मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.