महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'महाराष्ट्र के लोगो... जो झुट बोले उनकी खतम करो बेईमानी...' - राज्यपाल बातमी

आमच्याकडे कोविडचा हिशोब विचारता, जरुर विचारा. पण, महाराष्ट्रातील जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी उपायोजना कराव्या लागतात, तेव्हा आपला फंड महाराष्ट्राला न देता, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न देता दिल्लीला दिला. ज्यांनी तो दिला त्यांना धन्यवाद. पीएम (प्रधानमंत्री) केअर फंडचा हिशोब कोण देणार? त्यांना विचारायचे नाही. पीएम फंड चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. कोणी धाडस करून विचारले की देशद्रोही ठरवले जातो, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाला काढला.

CM
मुख्यमंत्री

By

Published : Mar 3, 2021, 6:48 PM IST

मुंबई - राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गाण्यातून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला 'ऐ महाराष्ट्र के लोगो, पोछ लो आँख का पानी, जो झुट बोले उनकी खतम करो बेईमानी', असे म्हणत त्यांनी गायलेल्या गाण्याची खिल्ली उडवली. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात माधव भंडारी या मुलाची गोष्ट ऐकवत राज्य सरकारवर टीका केली होती. मात्र, आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी माधव भंडारी की नारायण भंडारी असा प्रश्नार्थक सवाल केला आणि कोणीही असले तरी दोघेही दिव्यच आहेत, असे म्हणत टोला लावला.

पीएम केअर फंडचा हिशोब कोण देणार..?

आमच्याकडे कोविडचा हिशोब विचारता, जरुर विचारा. पण, महाराष्ट्रातील जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी उपायोजना कराव्या लागतात, तेव्हा आपला फंड महाराष्ट्राला न देता, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न देता दिल्लीला दिला. ज्यांनी तो दिला त्यांना धन्यवाद. पीएम (प्रधानमंत्री) केअर फंडचा हिशोब कोण देणार? त्यांना विचारायचे नाही. पीएम फंड चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. कोणी धाडस करून विचारले की देशद्रोही ठरवले जातो, असा चिमटाही त्यांनी विरोधी पक्षाला काढला.

बेळगाव सीमा प्रश्न

बेळगाव सीमाप्रश्नी राज्यसरकरला मदत करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून दिले होते. त्यासाठी सीमाप्रश्नी राजकीय वाद बाजूला ठेऊन राज्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते. सीमाप्रश्नी एकत्र येण्याची तयारी दाखवल्याबद्दल कर्नाटकवासी मराठी बांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा का नाही

मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन झाला. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ. पण, अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले. मराठी भाषा ही छत्रपतींची भाषा आहे. ती भाषा भिकारी कशी असू शकते, असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला.

हेही वाचा -महाराष्ट्राने कोरोनाची लढाई समर्थपणे लढली - मुख्यमंत्री

ABOUT THE AUTHOR

...view details