मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (शनिवार ता. १२ डिसेंबर) औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्याच्या हस्ते औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ होणार आहे.
असा आहे मुख्यमंत्री ठाकरे यांचा नियोजित दौरा
- दुपारी १२. १५ वाजता मुंबईहून शासकीय विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
- दुपारी १.०० वाजता औरंगाबाद येथे आगमन व गरवारे स्टेडियम, चिकलठाणाकडे प्रयाण
- दुपारी १.२० वाजता गरवारे स्टेडियम, चिकलठाणा येथे औरंगाबाद शहर पाणी पुरवठा योजनेचे प्रत्यक्ष भूमिपूजन
- दुपारी १.४० वाजता कार्यक्रमस्थळावरील व्यासपीठावर आगमन व दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे उद्घाटन व त्याअंतर्गत जंगल सफारी पार्कचे (आभासी पद्धतीने) उद्घाटन (आभासी पद्धतीने), औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ (आभासी पद्धतीने),
- उद्घाटन समारंभानंतर सोईनुसार शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण