मुंबई - लोअर परळ येथील पुलाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले. लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पूल जीर्ण झाल्याने हा पूल रेल्वेने तोडला असून त्याचे ८५ मीटर लांबीचे बांधकाम करण्यासाठी महानगरपालिका रेल्वेला १२५ कोटी रुपये देणार आहे. तसेच या पुलावर ना. म. जोशी मार्गावरून येणारे २ आणि गणपतराव कदम मार्गावरून येणारा १ असे मिळून ६०० मीटर लांबीच्या तीन रस्त्यांचे बांधकाम महानगरपालिका करणार आहे. सुमारे ९५.५० कोटी रुपयांच्या या कामामुळे वाहतुकीला दिलासा मिळणार आहे. दीड वर्षात (पावसाळा वगळून) हे काम पूर्ण करण्याचे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
आजपर्यंत हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा टीव्हीवर पाहत होतो. आज आपल्यामुळे सोहळा प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. आपली मुंबई सर्व बाजूंनी पसरत आहे. सुविधा कमी पडत आहेत आणि 'ट्रॅफिक जॅम' होत आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही नवीन रस्ते तयार करत आहोत. मुंबईत जन्मलेला मुख्यमंत्री तुम्हाला मिळाला आहे. यामुळे मला मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. आपल्याला वेळेचा खोळंबा दूर होण्यासाठी नाव्हाशिवा सागरी महामार्ग होत आहे.