महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साध्या, सात्विक विचारसरणीचा मापदंड राजकारणात निर्माण करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बातमी

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी रुग्णालय सोलापूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Jul 31, 2021, 1:08 AM IST

मुंबई - राजकारणातील एक साधे आणि सात्विक व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगोल्याचे माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी रुग्णालय सोलापूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले.

हेही वाचा -शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन; सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

सर्वाधिक काळ आणि सातत्याने त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले, हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात राहील.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील.

  • कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता - मुख्यमंत्री

सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

  • ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन -

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता अश्विनी रुग्णालय सोलापूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विधानसभेचे विद्यापीठ अशी ओळख असलेले गणपतराव देशमुख 55 वर्षे आमदार होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

हेही वाचा -'विधानसभेचं विद्यापीठ' : जाणून घ्या, गणपतराव देशमुखांबद्दल...

ABOUT THE AUTHOR

...view details