महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धमकी देऊ नये, एकच झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही - मुख्यमंत्री - जितेंद्र आव्हाड

थप्पड से डर नहीं लगता... पण, अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्यापेक्षा दामदुपटीने दिल्या आहेत. त्यामुळे आम्हाला धमकी देऊ नये, एक झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Aug 1, 2021, 4:41 PM IST

Updated : Aug 1, 2021, 5:17 PM IST

मुंबई -आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे. कौतुक केले की भीती वाटते. तो डायलॉग आहे ना थप्पड से डर नहीं लगता. पण, अशा थापडा घेत आणि देत आलो आहोत. जेवढ्या खाल्ल्या त्याच्यापेक्षा जास्त दामदुपटीने दिल्या आहेत, यापुढेही देऊ. आम्हाला धमकी देऊ नका, आम्ही एकच अशी झापड देऊ पुन्हा कधी उठणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

बोलताना मुख्यमंत्री

वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम होणार आहे. याचा शुभारंभ रविवारी (दि. 1 ऑगस्ट) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जांभोरी मैदानात करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार शरद पवार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

शिवसेना प्रमुखांसोबत चाळीत येत होतो

आयुष्यात काही क्षण अनपेक्षितपणे येतात. मुख्यमंत्री पद माझ्या स्वप्नातही नव्हते. आता त्याच्या खोलात जात नाही. लहानपणापासून या परिसरात येणे-जाणे आहे. शिवसेना प्रमुखांसोबत या चाळीत येत होतो. याच चाळीच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना होईल, असे स्वप्नातही पाहिले नाही.

36 महिन्यांत घरांच्या चाव्या देऊ

हे ट्रिपल सीट सरकार आहेत. आज भूमिपूजन केले 36 महिन्यांनी आपण सगळे एकत्र चाव्या देऊ. स्वतः हक्काची घर झाल्यावर मोहाला बळी पडू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा -ऑगस्ट क्रांतीदिनी ठरणार मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची दिशा - संभाजीराजे

Last Updated : Aug 1, 2021, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details