मुंबई - साकीनाका बलात्कार प्रकरणी संबंधितावर अट्रोसिटीचा दाखल केल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. दरम्यान, पिडीतेच्या कुटुंबाला राज्य शासनामार्फत वीस लाखाची आर्थिक मदत देणार असल्याचे नगराळे म्हणाले.
मुंबई पोलीस आयुक्त यांची पत्रकार परिषद साकीनाका बलात्कार प्रकरणाचा पोलीस तपास कशाप्रकारे सुरू आहे? याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. दोन दिवसांपूर्वी साकीनाका बलात्कार प्रकरणाबाबत सोशल मीडियावर चुकीचा संदेश पसरवला जातो आहे. याबाबत खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतल्याचे आयुक्त नगराळे यांनी स्पष्ट केले.
आरोपीविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल -
पीडित महिला ही एका विशिष्ट समाजाची असल्याने शासनाचा एसीएसटी अॅक्ट या गुन्ह्याला लावलेला आहे. त्याअनुषंगाने तपास सुरू आहे. घटनास्थळावर पीडित महिला कधी आली, आरोपी कधी आला, गुन्हा कसा घडला, त्यानंतर आरोपी कसा पळून गेला, या सगळ्याची पुराव्यासकट माहिती मिळाली आहे. आरोपीकडे असणारे प्रमुख हत्यारही आपण जप्त केले आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सर्व घटनेची माहिती दिली असून आरोपीला अटक केली असून 21 तारखेपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तसेच या संवेदनशील गुन्ह्यासाठी स्पेशल वकील राजा ठाकरे यांची नेमणूक केली आहे. ते आपल्याला तपासात मार्गदर्शन करत आहेत, असे आयुक्त नगराळे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -वाढदिवसाला कपडे भेट देऊन दाजीचा अल्पवयीन मेहुणीवर कारमध्ये बलात्कार, बुलडाण्यातील प्रकार
पीडितेच्या कुटुंबियांना 20 लाखांची मदत -
नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल कास्टचे वॉईस चेअरमन यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. आज दीड वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, स्थानिक आमदार, मुख्य सचिव, अपर उपसचिव आणि इतर अधिकारी या सगळ्यांची सह्याद्री अतिथिगृहावर या विषावर चर्चा झाली. पोलिसांच्या तपासावर कौतुक करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी विविध शासकीय मदत योजना जाहीर केल्या आहेत. त्या योजनांमधून आणि मुख्यमंत्री साहायता निधीतून पीडित महिलेच्या मुलींना 20 लाखांची दिली जाणार आहे. पीडितेला तीन मुली आहेत. त्याचबरोबर इतर शासकीय योजनांतून जेवढी मदत देता येईल तेवढी मदत केली जाईल, असेही आयुक्त नगराळे यांनी सांगितले.