महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी केले अभिवादन - Maharana Pratap latest news

आज (सोमवार) महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले.

CM Uddhav Thackeray greets Maharana Pratap in mumbai
महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरेंनी केले अभिवादन

By

Published : May 25, 2020, 4:40 PM IST

मुंबई- महाराणा प्रतापसिंह यांच्याकडून आपल्याला पराक्रमाचा महान वारसा मिळाला आहे. त्यांनी मातृभूमीसाठी लढताना पराकोटीचा स्वाभिमान जपला. त्यासाठी प्राणही पणाला लावले. त्यांचा हा पराक्रम आजच्या घडीला निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते.

आज (सोमवार) महाराणा प्रताप यांची जयंती आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केले. तसेच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विशेष कार्य अधिकारी चंदनशिवे, कक्ष अधिकारी ल. ना. सदाफुले तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details