महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Supriya Sule Tweet On Rickshaw Strike : पुण्यातील रिक्षाचालकांच्या संपाकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे - सुप्रिया सुळे - रिक्षाबंद आंदोलन मुख्यमंत्री शिंदे

पुण्यातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे आणि रिक्षा चालकांनी पुकारलेल्या बंदकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde should pay attention to rickshaw strike) यांनी लक्ष द्यावे अशी विनंती करणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule Tweet on Rickshaw strike Movement) यांनी केला आहे. रिक्षा चालकांच्या मागण्यांवर लवकरात लवकर चर्चा करून यावर तोडगा काढण्यात यावा असे या ट्विटमधून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. latest news from Mumbai

Supriya Sule Tweet On Rickshaw Strike
सुप्रिया सुळे ट्विट

By

Published : Nov 28, 2022, 3:50 PM IST

मुंबई :पुण्यातील रिक्षा संघटनांनी आपल्या काही मागण्यासाठी रिक्षा बंदचे आंदोलन (Rickshaw strike Movement Pune) आजपासून पुकारले आहे. या आंदोलनामुळे विद्यार्थी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. पुण्यातील नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे आणि रिक्षा चालकांनी पुकारलेल्या बंदकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde should pay attention to rickshaw strike) यांनी लक्ष द्यावे अशी विनंती करणारे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule Tweet on Rickshaw strike Movement) यांनी केला आहे. पुण्यातील रिक्षा चालकांच्या काही मागण्या आहेत रिक्षा चालकांच्या मागण्यांवर लवकरात लवकर चर्चा करून यावर तोडगा काढण्यात यावा असे या ट्विटमधून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. latest news from Mumbai,

सुप्रिया सुळे ट्विट

आंदोलनकारी मागणीवर ठाम :पुण्यातील रिक्षा चालक संघटनांनी प्रवासी सेवा देणाऱ्या प्रायव्हेट कार आणि बाईकच्या विरोधात रिक्षा बंदचे आंदोलन पुकारले आहे. काही रिक्षा चालकांनी आरटीओ ऑफिसच्या बाहेर आमरण उपोषण देखील सुरू केले आहे. प्रायव्हेट टॅक्सी ॲपच्या माध्यमातून प्रवासी सेवा पुरवत आहेत. या ॲपमधून पुण्यामध्ये बाईक टॅक्सी देखील सुरू करण्यात आली आहे. या ॲपमधून बाईक टॅक्सीचा पर्याय आरटीओने त्वरित रद्द करावा, ही प्रमुख मागणी रिक्षा चालकांची आहे. या विरोधात आज पासून पुण्यातील रिक्षा बंद आंदोलन संघटनांनी पुकारल्यामुळे पुण्यातील विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच नोकर वर्गाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details