महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुरक्षिततेची खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - मुंबई वर्षा गायकवाड बातमी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी 17 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

cm advises regarding reopening of schools news
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शाळा सुरू करण्याच्या सूचना

By

Published : Nov 8, 2020, 7:12 AM IST

Updated : Nov 8, 2020, 9:33 AM IST

मुंबई - विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांचीही उपस्थिती होती. जागतिक परिस्थिती पाहता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दिवाळी नंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का, याबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा. शाळांचे सॅनिटायजेशन, शिक्षकांची कोरोना तपासणी यासारख्या सर्व बाबींची काळजी घेणे आवश्यक आहे. ज्या घरातील व्यक्ती किंवा मुले आजारी आहेत, अशा पाल्यांना पालकांनी शाळेत पाठवू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
हेही वाचा -कोरोना संपल्यावर आम्ही सरकारला शांत बसू देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा
शिक्षकांची तपासणी करणार - वर्षा गायकवाड
शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी 17 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून करून घेतली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. 23 नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल चेकींग करण्यात येईल. एका विद्यार्थ्याला एका बाकावर बसवण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, अशा सूचनाही गायकवाड यांनी दिल्या.


टप्प्याटप्प्याने शाळा सुरू कराव्यात
शाळा सुरू करताना टप्प्या टप्प्याने शाळा सुरू कराव्या तसेच शाळा व्यवस्थित सुरू रहाव्या यासाठी स्थानिक प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची विनंती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केली. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सविस्तर एसओपी तयार करण्यात आली असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने टप्प्या टप्प्याने शाळा सुरू करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव कृष्णा यांनी सांगितले.

हेही वाचा -'गोस्वामी झिंदाबाद'चे नारे देणाऱ्यांची 'पाठशाळा' घेण्याची गरज, संजय राऊतांची भाजपवर टीका

Last Updated : Nov 8, 2020, 9:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details