महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लोकशाही महोत्सवाचे स्वागत, सर्वांनी यात सहभागी व्हा' - मुंबई news

आज निवडणूक आयोगाने लोकशाहीतील सर्वात मोठ्या महोत्सवाचे म्हणजेच निवडणुकीची घोषणा केली आहे, त्याचे मी स्वागत करतो असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री फडणवीस

By

Published : Sep 21, 2019, 5:58 PM IST

Updated : Sep 21, 2019, 6:11 PM IST

मुंबई- आज निवडणूक आयोगाने लोकशाहीतील सर्वात मोठ्या महोत्सवाचे म्हणजेच निवडणुकीची घोषणा केली, त्याचे मी स्वागत करतो, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. प्रत्येकाने मतदान करून या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस

प्रत्येकाचे प्रत्येक मत महत्वाचे असून ते अमूल्य आहे. आपले मत ही विकास प्रक्रियेतील फार मोठी शक्ती आहे. तसेच निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आचारसंहितेचे सर्वच राजकीय पक्षांनी पालन करावे आणि करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा - शिवसेना ५०-५० फॉर्म्युलावर ठाम; भाजप-सेना जुळे भाऊ - संजय राऊत

Last Updated : Sep 21, 2019, 6:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details