मुंबई - मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचे लिखित आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती लहूजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांनी दिली आहे. भाजप प्रदेश कार्यलयात ते बोलत होते. तसेच शिवसेना भाजप युतीला आपला पाठिंबा असल्याचे ही कांबळे यांनी यावेळी जाहीर केले.
मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव? - fadanvis
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा सकारात्मक झाली असल्याने लोकसभा निवडणुकीत लहुजी सेनेची ताकद शिवसेना आणि भाजप महायुतीला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
लहुजी सेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून सनेच्या अनेक मागण्या लिखित स्वरूपात मान्य केल्या असून मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याचे आश्वासनही दिले असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. त्याचबरोबर अनुसूचित जाती मध्ये अ, ब, क, ड अशी वर्गवारी करून उपेक्षित घटकांना न्याय देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे मांडली असल्याचे त्यांनी सांगितले. राजकीय आरक्षणात अनुसूचित घटकांना अधिक प्रतिनिधित्व मिळण्याच्या हेतूने कायद्यात बदल करण्याची मागणीही लहुजी शक्ती सेनेने केली आहे.