मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यानंतर उशिरा का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाग आली आहे. पिकांचे पंचनामे नाही झाले तरी मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पंचनामे झाले नाही तरी मदत करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश - परतीच्या पावसाने राज्यातील 70 टक्के पीक वाया गेले
राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यानंतर उशिरा का होईना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाग आली आहे. पिकांचे पंचनामे नाही झाले तरी मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
परतीच्या पावसाने राज्यातील 70 टक्के पीक वाया गेले आहे. या पार्श्वभमीवर शनिवारी तातडीने मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक बोलवण्यात आली असून, त्यामध्ये नुकसानभरपाई संदर्भात चर्चा होणार आहे. यामध्ये मदतीचा योग्य निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. पीकविमा कंपनीशी बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला देण्याचा आदेश पिक विमा कंपनीला दिला आहे. विमा कंपनीकडे पंचनामा करण्यासाठी आवश्यक म्हणून मनुष्यबळ नसल्याने सरकारी पंचनाम्यानुसारच भरपाई देण्यात यावी अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
ज्या शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामे झाले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, पंचनामे झाले नाही तरी आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी पंचनामे केले नाहीत तर स्वतः शेतकऱ्यांनी फोटो काढून पाठवावेत. त्याचाही मदतीसाठी विचार केला जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.