मुंबई - डायबिटीस सारख्या आजारातून मुंबई, महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकार सर्व प्रकारची मदत करायला सकारात्मक असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (शनिवारी) मुंबईत एका कार्यक्रमात दिले. फ्रीडम फ्रॉम डायबेटिस या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद त्रिपाठी, हिरानंदानी ग्रुपचे प्रमुख निरंजन हिरानंदानी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र डायबेटिस मुक्तीसाठी सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री फडणवीस - niranjan
आजपर्यंत आपण मागील सात वर्षात शेकडो लोकांना कायमचे डायबेटिस पासून मुक्ती मिळवून दिली असून ही चळवळ अधिक गतिशिल करण्यासाठी आम्हाला सरकारनेही समोर येऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री म्हणाले, या कार्यक्रमाने प्रभावित झालो, अनेकांच्या कथा ऐकूण आणि ते काही दिवसांच्या आत डायबेटिसपासून मुक्त झाल्याचे पाहून आपण आश्चर्यचकित झालो. त्यामुळे त्रिपाठी यांनी सुरू केलेली ही डायबेटिस मुक्तीची चळवळ राज्यात पोहचली पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सर्वच समाजात खाण्याच्या सवयी आणि त्यात बदल झाल्याने डायबेटिस सारख्या आजाराला आपण बळी पडतोय, पण यासाठी आता सामूहिकपणे लढले पाहिजे, यासाठी सरकार तुमच्यासोबत आहे, सगळ्या प्रकारची आम्ही मदत करू असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुंबई आणि महाराष्ट्र हा डायबेटिस फ्री झाला पाहिजे, असे सांगत मला पुढच्या वर्षीही कार्यक्रमाला बोलवा, मला यायला आनंद वाटेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी फ्रीडम फ्रॉम डायबेटिसचे डॉ. प्रमोद त्रिपाठी यांनी डायबेटिसवर सहजपणे नियंत्रण मिळवता येते, त्यासाठी आहार आणि मनातून त्यासाठीचे सकारात्मक विचार आणणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. आजपर्यंत आपण मागील सात वर्षात शेकडो लोकांना कायमचे डायबेटिसपासून मुक्ती मिळवून दिली असून ही चळवळ अधिक गतीशील करण्यासाठी आम्हाला सरकारनेही समोर येऊन सहकार्य करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी आमदार विवेक पंडित यांच्यासह ज्यांचा डायबेटिस काही दिवसांत पूर्ण बरा झाला त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.