मुंबई - मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थिती गंभीर आहे. याठिकाणी पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोल्हापूरची पूरस्थिती गंभीर; सांगलीत अतिवृष्टी - मुख्यमंत्री - महाराष्ट्रातील पूरस्थिती
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. कोल्हापूरची पूरस्थिती अधिकच गंभीर असून त्याठिकाणी ओडिशा आणि गुजरातमधून बचाव पथक बोलावले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. मिरज आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या पूर्ण गाड्या रद्द झाल्या आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावर ४ फूट पाणी होते. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती. एनडीआरएफच्या पथक बचावकार्य राबवत आहे. कोल्हापूरची स्थिती अधिकच गंभीर असून त्याठिकाणी ओडीशा आणि गुजरातमधून बचाव पथक बोलावले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बचावकार्य करण्यात येणार आहे. आज जास्तीत जास्त प्रमाणात बचावकार्य करण्यात येणार आहे. मी कोल्हापुरात गेलो नाही. मात्र, संपूर्णपणे कोल्हापूर आणि सांगलीतील पुरावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पूरपरिस्थितीतून ग्रामस्थांना बाहेर काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.