महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारी मुंड्या चित केले; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर - मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस

या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारी मुंड्या चित केलं आहे. काही लोक नखे कापून शहीद झाल्याचा आव आणतात आणि म्हणतात, आम्ही ईडीला घाबरत नाही. पण आम्हाला ईडीची गरजच नाही’, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला

मुख्यमंत्री फडणवीस

By

Published : Oct 19, 2019, 11:03 AM IST

मुंबई - आम्ही लहान लोकांशी लढत नाही. लहान मुलांशी लढत नाही, हे खरं आहे पवार साहेब आम्ही लहान आहोत. पण एक गोष्ट तुम्हाला विचारतो, पाच वर्ष पदोपदी तुम्ही आमच्याशी बरोबरी केली. पण, आम्ही तुमच्याशी लढलो. आणि या लहान मुलांनीच तुमच्या पक्षाला चारी मुंड्या चित केलं आहे. काही लोक नखे कापून शहीद झाल्याचा आव आणतात आणि म्हणतात, आम्ही ईडीला घाबरत नाही. पण आम्हाला ईडीची गरजच नाही’, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभा मुंबईतील वांद्रे येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

‘पवारांची अवस्था ‘शोले’ मधील जेलरसारखी’

भारतीय जनता पक्षात येण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची रांग लागली होती. त्यातील महत्त्वाच्या लोकांना आम्ही घेतल्यानंतर उर्वरित नेतेही आमच्या पाठीमागे लागले होते. परंतु, त्यांना आम्ही नकार दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत बोटावर मोजण्याएवढी लोकं तरी राहू शकली. अर्थात, जे पैलवान राष्ट्रवादीत आहेत, त्यांच्यातही आपापसांत लढती होत असतात. त्यामुळे शरद पवारांची अवस्था सध्या शोले चित्रपटातील जेलरसारखी झाली आहे. आधे इधर आधे उधर बाकी मेरे पीछे… असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत लगावला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, मुंबईतील विकासकामं पुढं नेली. मुंबईच्या विकासकामांना पंतप्रधान मोदींनी चालना दिली. मुंबई देशातले सर्वोत्तम महानगर करणार. मुंबईतील सर्व गरिबांना घर देणार आहे. नव्या मुंबईसाठी आधुनिक सेवासुविधा उभारण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे. १ कोटी रोजगार आणि दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचाय. तुमचा आशीर्वाद आमचा जनादेश आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details