मुंबई - 'राज्यातील अडीच कोटी जनता पुरात अडकली आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले नाही. ते महाजनादेश यात्रेत मस्त आहेत' असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
मलिक पुढे म्हणाले, आम्ही परिस्थिती सांगितल्यानंतर तिकडे जाण्याऐवजी मुख्यमंत्री मुंबईत भूखंड कोणाला द्यायचा, याचा निर्णय घेत बसले. आज ते कोल्हापूरला निघाले आहेत. मात्र, त्यांच्याच दिमतीला हजारो अधिकारी, कर्मचारी लागले आहेत. यामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढतील. सरकारने राजकारण बाजूला ठेवून आपत्ती व्यवस्थापन आणि इतर संबंधित यंत्रणेची मदत तत्काळ लोकांना मिळवून द्यावी, अशी मागणीही मलिक यांनी यावेळी केली.