मुंबई - मुंगेरीलालचे स्वप्न दाखवून लोक भुलणार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शेवटच्या माणसाला घर मिळत नाही तोपर्यंत काम सुरुच ठेवण्याचेही आश्वासन उपस्थितांना दिले. ते एअरपोर्टच्या जागेवरील घरांच्या चावी वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.
मुंगेरीलालचे स्वप्न दाखवून लोक भुलणार नाही; मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका - राहुल गांधी
फडणवीस म्हणाले, की आम्ही केंद्राची ६५ एकर जागा मिळवली. मात्र, काँग्रेसकडे इच्छाशक्ती आणि बांधिलकी नव्हती त्यामुळेच त्यांना ते शक्य झाले नाही. राजीव गांधी १९८८ मध्ये येथे आले होते. तेव्हापासून हे काम सुरू झाले नाही, पण आम्ही साडेतीन वर्षातच सर्वांचे प्रश्न सोडवले.

फडणवीस म्हणाले, की आम्ही केंद्राची ६५ एकर जागा मिळवली. मात्र, काँग्रेसकडे इच्छाशक्ती आणि बांधिलकी नव्हती त्यामुळेच त्यांना ते शक्य झाले नाही. राजीव गांधी १९८८ मध्ये येथे आले होते. तेव्हापासून हे काम सुरू झाले नाही, पण आम्ही साडेतीन वर्षातच सर्वांचे प्रश्न सोडवले. आम्ही धारावीच्या बाजूला असलेली रेल्वेची ४५ एकर जागा मागितली आणि मोदींशी चर्चा केली. कालच धारावीच्या गरिबांच्या घरांसाठी ४५ एकर जागा आम्हाला मिळाली. यावेळी फडणवीस यांनी आम्ही भाषणे देणारे नसल्याचे म्हणत आम्ही करून दाखवणारे असल्याचे म्हटले.
मोदी जेथे आहेत, तेथे काहीही अशक्य नाही. देशातील प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्याची काम सरकारने केले आहे. ते भरकटवण्याचा प्रयत्न करतील, मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.