महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : कर्नाटक दौऱ्यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील - देवेंद्र फडणवीस - Karnataka CM Warn Maharashtra Minister

महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा कर्नाटक दौरा आयोजित असताना, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात न येण्याचा सज्जड इशारा दिला आहे. त्यावरून आता सीमा वाद आणखी चिघळला ( Karnataka Maharashtra Border Dispute ) आहे.

devendra fadanvis
देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 5, 2022, 5:27 PM IST

मुंबई : कर्नाटक - महाराष्ट्र सीमा वादावरून राजकारण तापलेले असताना आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडू लागल्या ( Karnataka Maharashtra Border Dispute ) आहेत. अशातच महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकमध्ये येऊ नये असा सज्जड इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिला ( Karnataka CM Warn Maharashtra Minister ) आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई यांचा उद्याचा दौरा होणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह ( Maharashtra Minister visit Karnataka ) आहे. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले आहेत की, आम्ही कोणालाही घाबरत नाही. असे म्हटले आहे. ते मुंबईत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस

काय म्हणाले उपमुख्यमंत्री? :यासंदर्भामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू ( Boundary Dispute In Supreme Court ) आहे. त्या कारणाने कर्नाटक सरकार सुद्धा निर्णय घेऊ शकत नाही व महाराष्ट्र सरकार सुद्धा निर्णय घेऊ शकत ( Karnataka Maharashtra Border Dispute ) नाही. याबाबत जो काही निर्णय आहे तो फक्त सर्वोच्च न्यायालय घेऊ शकणार आहे, म्हणून मला असे वाटते की विनाकारण या संदर्भामध्ये कुठलाही नवीन वाद निर्माण होऊ नये. महाराष्ट्राने अतिशय ताकतीने आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडलेली आहे. मला असे वाटते की सर्वोच्च न्यायालयामधून आपणाला पूर्णता न्याय भेटेल. उद्या महापरिनिर्वाण दिवस असल्याकारणाने कुठेही अनुचितप्रकार घडू नये म्हणून त्यावर आम्ही अजूनही विचार करत आहोत. या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असे त्यांनी सांगितले आहे.

आम्ही कोणालाही घाबरत नाही :मंत्र्यांचा जो काही दौरा कर्नाटक मध्ये होता, तो महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होता. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मंत्री तेथे कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी जाणार होते. यासंदर्भामध्ये कर्नाटकचे काही म्हणणे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचा सुद्धा काही म्हणणे आहे. परंतू मंत्र्यांनी ठरवले तर त्यांना तिथे जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. म्हणून महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अशा प्रकारचा वाद निर्माण करायचा का हा सुद्धा एक प्रश्न आहे? म्हणून यासंदर्भामध्ये आम्ही योग्य तो विचार करत आहोत. माननीय मुख्यमंत्री या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतील. परंतू प्रथमतः आमचे असे म्हणणे आहे की महापरिनिर्वाण दिन हा सर्वात मोठा दिवस आहे. म्हणून त्या दिवशी एखादे आंदोलन व्हावे किंवा एखादी कुठली चुकीची गोष्ट व्हावी, हे आपणाला पटत नाही. भविष्यातही आपणाला तेव्हा त्या ठिकाणी तिकडे जाता येईल. तिकडे जाण्यापासून आम्हाला कोणीच रोखू शकत नाही. कोणी त्या ठिकाणी जायला घाबरत सुद्धा नाही, म्हणून मला असं वाटतं की स्वतंत्र भारताच्या कोणत्याही इलाख्यामध्ये कोणी कुठेही जाऊ शकतो. परंतु महापरिनिर्वाण दिवस असल्याकारणाने त्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील.

ABOUT THE AUTHOR

...view details