महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दत्तक घेणार - इर्शाळवाडीतील अनाथ मुलांना एकनाथ शिंदे दत्तक घेणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनने इर्शाळवाडी भूस्खलनात अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

Irshalwadi Landslide
इर्शाळवाडी भूस्खलन

By

Published : Jul 22, 2023, 3:46 PM IST

मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात नुकत्याच झालेल्या भूस्खलनात आई - वडील गमावलेल्या मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दत्तक घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, इर्शालवाडी भूस्खलनात अनेक मुलांनी त्यांचे आई - वडील गमावले आहेत. या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पालक बनण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांची काळजी घेणार : 2 वर्षे ते 14 वर्षे वयोगटातील या अनाथ मुलांची काळजी श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे म्हणाले की, मुलांच्या शिक्षण आणि इतर बाबींचा सर्व खर्च एकनाथ शिंदे यांच्या श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाईल. प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी एफडी (फिक्स्ड डिपॉझिट) सुद्धा केली जाईल.

मृतांचा आकडा 26 वर पोहोचला : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 26 वर पोहोचला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) शनिवारी देखील भूस्खलनग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफचे आणखी एक पथक आज सकाळी घटनास्थळी पोहोचले. यानंतर आता आणखी काही टीम शोध मोहिमेत सामील होण्याची अपेक्षा आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर : मुंबईपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात डोंगर उतारावर असलेल्या या आदिवासी गावात बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दुर्घटनास्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. शाह म्हणाले की, बचाव कार्य हाताळण्यासाठी एनडीआरएफच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा :

  1. Irshalwadi Landslide rescue operation: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 26 वर, बचावकार्याला पुन्हा सुरुवात
  2. Irshalgad Landslide: इर्शाळवाडीचे पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत: उद्धव ठाकरे
  3. Chandepatti village: दरड कोसळण्याच्या भीतीने चांदेपट्टी गावातील नागरिकांचे स्थलांतर ...

ABOUT THE AUTHOR

...view details