मुंबई:मुंबईच्या वरळी कोळी वाड्यातील तसेच अन्य मच्छीमार संघटनांकडून गेल्या अनेक दिवसांपासून पोस्टर रोडच्या दोन पिलर मधील अंतर वाढवावे, अशी मागणी सातत्याने होत होती. Coastal Road Project या संदर्भात युद्ध पातळीवर सर्व आढावा घेऊन कोळी बांधवांसाठी सरकारकडून तातडीने निर्णय घेतला, असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी दिली आहे.
कोळी समाजावर अन्याय होऊ नये यासाठी निर्णय घेण्यात आला असून लोकांवर अन्याय होऊ नये यासाठी बाळासाहेबांची शिकवण होती. कोळीवाड्याच्या प्रश्नांसाठी समिती गठीत केली होती. या समितीमध्ये अनेकांचा समावेश होता. तसेच महापालिका आयुक्तांना ही सूचना दिल्या होत्या. आयुक्तांनी युद्ध पातळीवर आढावा घेऊन तोडगा काढला आहे. दोन पिलर मधील अंतर 120 मीटर करण्यात येणार आहे. यासाठी साडे सहाशे कोटी रुपये अधिकचा खर्च येणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची तयारी आहे, असेही शिंदे म्हणाले. यामुळे कोळीवाड्यातील बांधवांच्या मत्स्यमारी बोटीला कुठेही अडचण येणार नाही.
कोळीवाड्याच्या सीमांकन बाबत सकारात्मक भूमिका:कोळीवाड्यांचे सीमांकन झाल्यानंतर पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल, त्यांचे हक्क त्यांना मिळतील. कोळीवाड्यांचा विकास व्हावा, यासाठी देखील आम्ही योजना आणत आहोत. यासाठी अधिक मनुष्यबळ आणि अधिक यंत्रणा वापरायला लागली तरी हरकत नाही, असेही ते म्हणाले आहेत.