मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांची दुरावस्था झाली आहे. अनेक रुग्णालयात सोयी - सुविधांचा अभाव आहे. परिणामी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. भगवती रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात तर आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेला तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश द्यावी, अशी मागणी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला करण्यात आली. येत्या महिनाभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई मनपा आयुक्तांना दिल्याचे मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. (avoid inconvenience to patients)
रूग्णालयात चांगली आरोग्य सुविधा दिली जात नाही :आमदार सचिन अहिर (Sachin Ahir), विलास पोतनीस (Vilas Potnis), सुनील शिंदे (Sunil Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad), प्रविण दरेकर (Pravin Darekar)आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी रुग्णालयाच्या कारभाराचे वाभाडे काढले. शवागृहांची अवस्था बिकट आहे (condition of mortuaries is bad). ईएसआय रुग्णालयात चांगली आरोग्य सुविधा दिली जात नाही. कंत्राटीकरण पध्दतीने आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयातील सेवा - सुविधांचा पाढा भगवती रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत सुमारे दोनशे कोटींचा घोटाळा झाला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या प्रसाद लाड यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. (Hospitals do not provide good healthcare facilities)