मुंबई :महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आर्थिक मंच (WEF) मेळाव्यासाठी दावोसचा आपला दौरा थोडक्यात आटोपण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत सुविधा व इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.
दावोस भेट सुरळीत पार पडेल : या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काळजी करण्याची गरज नाही. मी दावोसला जात आहे आणि महाराष्ट्र आणि मुंबईसाठी मोठी गुंतवणूक आणणार आहे. दावोस भेट आणि पंतप्रधानांचा दौरा सुरळीत पार पडेल. आमचे प्रकल्प आणि पंतप्रधान यांच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पंतप्रधान मोदी मुंबईसाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा (WEF) दौरा थोडक्यात आटोपण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला मुंबईला भेट देणार आहेत.
उदय सामंत हे देखील दावोसमध्ये सामील :औद्योगिक मंत्री उदय सामंत हे देखील दावोसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील होणार आहेत. उदय सामंत दावोसला रवाना होणार आहेत. शिंदे फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असेल. त्यांच्या या दौऱ्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक अद्याप कळवलेले नसले तरी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर १९ जानेवारीला हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या भेटीमध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.