मुंबई :गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ( CM Eknath Shinde on Cabinet ) दिले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार असल्याची माहिती त्यांनी वर्षा निवासस्थानी पत्रकारांशी अनोपचारिक गप्पा मारताना ( Cabinet Ministry expansion ) दिली. तसेच समृद्धी महामार्गाचे उद्घाटनही नोव्हेंबर महिन्यात होईल असे स्पष्ट केले.
राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे अनेक खात्यांचा पदभार आहे. तर काही मंत्र्यांकडे एकापेक्षा अधिक महत्त्वाची खाती आहेत. त्यामुळे मंत्र्यांवरील भार कमी करून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केला.
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तारमंत्रिमंडळ खाते वाटपाचा फॉर्म्युला यापूर्वीच ठरला आहे. तसेच मंत्र्यांच्या संख्येबाबतही यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता केवळ मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा आहे. मंत्र्यांची यादी सुद्धा तयार आहे. अधिवेशनापूर्वी हा विस्तार करण्याचा सरकारचा विचार असल्याची संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. आपल्या पक्षात कोणीही नाराज नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. आपल्याला केवळ जनतेची काम करायची आहेत. तेच आपले उद्दिष्ट आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी शक्य तेवढी झोप घेतो -मी यापूर्वी सुद्धा लोकांची कामे करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जागत होतो. आता मुख्यमंत्री झाल्यामुळे माझ्यावर कामाची अधिक जबाबदारी आली आहे. आणि लोकांना माझ्याकडून अधिक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मला काम करावेच लागणार आहे. म्हणूनच मी रात्री तीन वाजेपर्यंत काम करतो. सकाळी सात वाजता उठतो एवढी झोप सध्या तरी मला पुरेशी वाटत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्री कधी झोपतात हा संशोधनाचा विषय आहे, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर ( Eknath Shinde on sleeping time ) मुख्यमंत्री बोलत होते.