फडणवीसांवर बोलण्याचा ठाकरेंना अधिकार नाही मुंबई: शिवसेना आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महिला पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ ठाण्यात मोर्चा काढला. महाविकास आघाडीचे नेत्यांनी सभा घेत, सरकारचे वाभाडे काढले. आदित्य ठाकरे यांनी आगामी काळात ठाण्यातून उभे राहणार असल्याचे संकेत देत, मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ठाण्यातील मोर्चावरून टीका : उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झाले असून सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप सुरू आहे. सत्ताकाळात त्यांनी गुंडागर्दी केली. आम्ही तसे काही केले नाही. बोलण्यासारखे आमच्याकडे बरंच काही आहे. योग्य वेळ आली की बोलू, मात्र उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांवर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आदित्य ठाकरे यांच्या ठाण्यातील मोर्चावरूनही त्यांनी टीका केली.
निवडणूक लढवायच्या अधिकार: मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीमध्ये कोणालाही कुठेही उभा राहून निवडणूक लढवायच्या अधिकार आहे. जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचे कोणाला पाडायचे, हे ठरवते. मात्र, बोलणाऱ्याचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आलो. शिवसेना उभी करण्यात माझ्यासारखे लाखो कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. घरा दारावर तुळशी पत्रक ठेवली. त्यामुळे सोन्याच्या चमचा घेऊन जर आलेत त्यांच्यावर मी काय बोलणार, असा आदित्य ठाकरे यांना लगावला.
टिकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले: उद्धव ठाकरे यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेवरून हल्लाबोल केला. ठाण्यात काल तणावाखाली लोक पाहायला मिळाली. सत्तेत असताना त्यांनी सर्व मर्यादा सोडल्या होत्या. आता सत्ता हातून गेल्यानंतर काय परिस्थिती होते, हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. फडणवीस यांनी संयम बाळगला म्हणून नाहीतर ते उद्धव यांना उद्धट किंवा उध्वस्त ठाकरे बोलू शकले असते पण ते बोले नाहीत.
किती ही गुंडा गर्दी :ठाकरेंच्या सत्ता काळात दोन मंत्री जेलमध्ये गेले. गृहमंत्री जेलमध्ये गेले. पोलीसाची अब्रू त्यांची धिंड त्यांनी काढली. कोणी विरोधात बोललं त्याला जेलमध्ये टाकण्यात आले. नारायण राणेंना जेवणावरून उठवले. कंगना राणावत यांचा घर तोडले. हनुमान चालीसा बोलले म्हणून नवनीत राणा व रवी राणाला जेलमध्ये टाकण्यात आले. ही किती गुंडा गर्दी होती. ठाकरे ही गुंडागर्दी विसरले असतील. मात्र, आम्ही असे काय केले नाही. आम्ही आमच्या मर्यादा ही सोडणार नाही. आम्हाला बाळासाहेबांची तशी शिकवण आहे. परंतु, मंगळवारी जे काही मी पाहिले ते महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
फडणीस यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही: महाविकास आघाडीतील सर्वजण वैफल्यग्रस्त झाले आहेत. सत्तेच्या खुर्चीसाठी सगळा हा खेळ सुरू आहे. ठाकरेंकडून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न सुरू आहे. हे महाराष्ट्र असून महाराष्ट्रातील जनता ही सगळ्यांना ओळखते. आता ते बोलले असले त्यांच्यापेक्षा तिखट आम्हालाही बोलता येते. आमच्याकडे खूप काय काय आहे. योग्य वेळी आम्ही सगळं बोलू, असा इशारा ठाकरेंना देताना देवेंद्र फडणीस यांच्यावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे ठणकावले. फडणवीस यांनी कामातून त्यांचं कर्तुत्व सिद्ध करून दाखवलेला आहे. परंतु, हे बोलत आहेत, त्यांचे कर्तुत्व काय आहे. वडिलांची म्हणजे बाळासाहेबांची पुण्याईने मिळाले आहे. ते नाव सोडलं तर काय आहे तुमच्याकडे.? महाराष्ट्राची जनता कामाला महत्व देते आरोपांना नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
गौरव यात्रेबाबत गैरसमज: सध्या सावरकर यांच्याविरोधात बोलले कात आहे. मात्र, सावरकर यांच्याबद्दल जेवढे बोलू तेवढे कमी आहे. त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सावरकर यांच्या गौरव यात्रेबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे हर घर सावरकर ही मोहीम राबवायला हवी. आता हे सुद्धा काही लोक चोरत आहेत. ज्यांना अडीच वर्षात काही सुचलं नाही, त्यांना उशिरा आठवल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
हेही वाचा: Dhirendra Shastri अखेर धीरेंद्र शास्त्री यांना झुकावेच लागले ट्विट करून साई भक्तांची मागितली माफी