महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार अपात्र प्रकरणी हालचालींना वेग; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि DGP यांच्यात झाली बैठक - शिवसेना आमदार अपात्र

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी मुंबईत हालचारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यात मंगळवारी रात्री उशिरा बैठक झाली.

शिवसेना आमदार अपात्र
शिवसेना आमदार अपात्र

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 10:57 PM IST

मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी निकालाला काही तास शिल्लक असताना, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सुद्धा वर्षा बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.

राहुल नार्वेकरांचं उत्तर : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी १० जानेवारी रोजी दुपारी चार वाजता निकाल अपेक्षित आहे. दोन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकारण तापलं आहे. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. न्यायाधीश आरोपीला भेटायला गेले तर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला होता. यावर राहुल नार्वेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details