महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ambadas Danve on CM : कळवा रुग्णालयातील मृत्यूची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचीच; उद्धव ठाकरे असते तर... - Ambadas Danve on CM eknath shinde

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात 48 तासात 18 जणांचा मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या रुग्णांच्या या मृत्यूला सध्याचे सरकार आणि मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. तर शिंदे गटाच्या नेत्यांना आता कमळाच्या चिन्हावरच लढावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ही घटना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घडली असती तर भाजपाने महाराष्ट्र डोक्यावर घेतला असता, अशी टीकाही दानवे यांनी केली.

Danve Criticized CM Shinde
अंबादास दानवे

By

Published : Aug 14, 2023, 8:22 PM IST

कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी अंबादास दानवेंची प्रतिक्रिया

मुंबई:ठाणे जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील रुग्णालयात एका रात्रीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून सरकारच्या अनास्थेमुळेच हे घडत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.


मुख्यमंत्रीच जबाबदार:अशी घटना एखाद्या दुसऱ्या राज्यात घडली असती तर भाजपने त्या राज्यातील सरकारचा राजीनामा मागितला असता. आता हीच घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. तरीही भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का गप्प आहेत? या नेत्यांना जनतेच्या दुःखाचे काहीही पडलेले नाही. ठाणे शहर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गृह जिल्हा आहे. यासाठी आरोग्य यंत्रणे सोबतच राज्य सरकारची अनास्था आणि मुख्यमंत्रीसुद्धा जबाबदार आहे, असा आरोप अंबादास दानवेंनी केला. एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाचा ठाणे महानगरपालिकेवरती अनेक वर्षांपासून प्रभाव राहिला आहे. त्यामुळे या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.


तर कमळाच्या चिन्हावर लढा:शिंदे गटाचे काही आमदार आता जर आम्हाला चिन्ह मिळाले नाही तर आम्ही कमळावरसुद्धा लढायला तयार आहोत, असे म्हणताना दिसत आहे. वास्तविक शिंदे गटाच्या आमदारांनी कमळाच्या चिन्हावर लढावे, अशीच भाजपची इच्छा आहे. त्याच दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाचे आमदार कोणत्याही चिन्हावर लढले तरी राज्यातील जनता आणि शिवसैनिक त्यांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही, असेही यावेळी दानवे म्हणाले.

घटना दुर्दैवी पण: ठाण्यातच्या कळव्यात महानगरपालिकेच्या रुग्णालयात काही तासात अनेक रुग्ण दगावले आहेत. ही घटना दुर्दैवी आहे; मात्र ही घटना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात घडली असती तर भाजपने महाराष्ट्र डोकेवर घेतला असता. जी महानगरपालिका आहे त्या महानगरपालिकेचे नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करतात. त्या मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत असलेल्या रुग्णालयाची ही अवस्था असेल आणि 19 जणांचा नाहक बळी जात असेल तर याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्य खाते जबाबदार आहे. यांना माणसाच्या आरोग्याची चिंता नाही जीवाची तर मुळीच चिंता नाही. म्हणून अशा घटना होत असताना याबाबतीत राज्य सरकारने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, असा आरोप विधानसभा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला.

हेही वाचा:

  1. Kalwa Hospital Patient Death Case: कळवा हॉस्पिटलमध्ये मृत्यूचे थैमान; अश्रू.. हुंदके आणि टाहो
  2. Kalwa Hospital Death Incident : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील कळवा रुग्णालय बनले मृत्यूचा सापळा; विरोधक आक्रमक

ABOUT THE AUTHOR

...view details