महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde : शिंदे गटाचे ४० आमदार घेऊन मुख्यमंत्री पुन्हा जाणार गुवाहाटीला, 'हे' आहे कारण - CM Eknath Shinde To Take Kamakhya Devi Darshan

मुख्यमंत्री शिंदेंना यांचा पहिलाच दौरा गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी असल्याची माहिती मिळत ( CM Eknath Shinde To Take Kamakhya Devi Darshan  ) आहे. पुढील आठवड्यात या दौऱ्याचे नियोजन झाले असून यावेळी शिंदे गटाचे ४० आमदार सोबत असणार आहेत.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री शिंदे

By

Published : Nov 6, 2022, 12:23 PM IST

Updated : Nov 6, 2022, 12:39 PM IST

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर सुरत व्हाया गुवाहाटी गाठून मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला. तसेच अयोध्येला जाण्याची घोषणा केली. मात्र, आता मुख्यमंत्री शिंदेंना याचा विसर पडला असून ते पहिलाच दौरा गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी करणार असल्याची माहिती मिळत ( CM Eknath Shinde To Take Kamakhya Devi Darshan ) आहे. पुढील आठवड्यात या दौऱ्याचे नियोजन झाले असून यावेळी शिंदे गटाचे ४० आमदार सोबत असणार आहेत.


कामख्या देवीचे दर्शन : शिवसेनेतील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठले. सुरतनंतर गुवाहाटी गाठत शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले. शिंदेंच्या बंडाने सरकार अल्पमतात आल्याने ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. शिवसेनेकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली. कामाख्या देवीला ४० रेडे पाठवले असल्याची सडकून टीका यावेळी करण्यात आली होती. शिंदे यांनी या टीकेला उत्तर देताना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन हिंदुत्वापासून लांब गेलो. आता हिंदुत्वासाठी शिवसेनेत बंडखोरी केल्याचे स्पष्ट केले. तसेच लवकरच अयोध्या दौरा आणि 'कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र शिंदेंना अयोध्या दौऱ्याचा विसर पडला असून पहिला दौरा गुवाहाटीला करणार आहेत. यावेळी सत्तांतरावेळी गुवाहाटीला असताना ज्यांनी मदत केली, त्या सर्व व्यक्तींची शिंदे आवर्जून भेट घेणार आहेत. त्यानुसार पुढील आठवड्यात गुवाहाटी दौऱ्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.


कामख्या देवीच्या दर्शनाची जबाबदारी युवसेनेवर : गुवाहाटी येथील कामाख्या देवीच्या दर्शनाच्या तयारीची जबाबदारी युवसेनेवर सोपवण्यात आली ( Kamakhya Devi Darshan Responsibility On Yuvsena ) आहे. युवा सेनेचे सचिव किरण साळी, बाजीराव चव्हाण, शिंदे यांचे स्वीय सहाय्यक; तसेच इतर पदाधिकारी गुवाहाटीला गेले आहेत. आसामच्या पोलिस महासंचालकांची ते भेट घेणार असून तेथील सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ४० आमदार देखील असणार ( Kamakhya Devi Darshan 40 MLA) आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून हालचाली सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Last Updated : Nov 6, 2022, 12:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details