मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया मुंबई - महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. विविध याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नैतिकतेच्या मुद्द्यावरही शिंदे, फडणवीस यांनी जोरदार प्रहार केला आहे.
शिंदेंचा ठाकरेंच्या नैतिकतेवर जोरदार प्रहार - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर आम्ही समाधानी आहोत. या निर्णयाने महाविकास आघाडीला चपराक लगावली आहे. मेरिटवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. परिस्थितीनुसार राज्यपालांनी निर्णय घेतला होता. बहुमत सरकारकडे होते हे सर्वांना माहिती होते. तसेच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आता नैतिकता शिकवू नये, राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची नैतिकता कुठे होती, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. व्हीपसाठी तुमच्याकडे माणसे किती आहेत. तसेच नैतिकतेवर बोलायचा अधिकार ठाकरेंना नाही. यापुढेही दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाऊ शकतो. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. नियमाबाहेर कोणाला जाता येणार नाही. आमचे सरकार कायदेशीर चौकटीतच आहे. बहुमताचे सरकार स्थापन केले होते. घटनाबाह्य सरकार म्हणाऱयांना चपराक दिली आहे. शिवसेना आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. त्यामुळे व्हीप आमचाच असेल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आता नैतिकता शिकवू नये, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत जाऊन सरकार स्थापन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांची नैतिकता कुठे होती - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आमचे सरकार घटनेनुसारच -निकालाबद्दल आम्ही समाधान व्यक्त करतो. हा लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय आहे. सर्वोच्च महाविकास आघाडीचा चपराक आहे. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षच घेणार आहेत. त्यामुळे आमदारांचे सर्व अधिकार त्यांना आहेत. तसेच निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयानंतर दिली आहे.
नैतिकतेवर बोलणे ठाकरेंना शोभत नाही -उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद मी बघत नाही. पण आज शेवटचा भाग बघितला आहे. उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचा मुद्दा मांडला आहे. उद्धव ठाकरे हे भाजपासोबत निवडणूक आले आणि काँग्रेस, राष्ट्वादीसोबत गेले तेव्हा त्यांची नैतिकता कुठे होती, अशी खोचक प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नैतिकतेचा विषय तुम्ही सांगू नये, नैतिकतेवर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. लोकं सोडून गेल्याच्या लाजेपोटी आणि भीतीपोटी उद्धव ठाकरे यांनेी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नैतिकतेचा विषय बनवू नका. एकनाथ शिंदेंचा राजीनामा देण्याचा विषयच होत नाही, तेच मुख्यमंत्री आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- Narayan Rane On Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले; नारायण राणेंनी डिवचले
- SC on Uddhav Thackeray Resigns : उद्धव ठाकरेंचा राजीमाना शिंदे-फडणवीसांचा विनर पाईंट
- Cabinet expansion : सुप्रीम निरीक्षणानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा, बच्चू कडू संजय शिरसाटांसह इतरांच्या आशा पल्लवीत