मुंबई : राज्य अर्थसंकल्पाचा आज शेवटचा दिवस होता. विरोधी पक्षांनी आणलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले उत्तर पुन्हा एकदा राजकीय भाषण ठरले. मुख्यमंत्र्यांनी कुठल्याही प्रश्नाला ठोस उत्तर न देता केवळ वरवर स्पर्श करीत कुठल्याही आकडेवारीत न जाता राज्य वेगवान आहे, गतिमान सरकार आहे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधींवर टीका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात बोलताना म्हणाले की, आज देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे काय वक्तव्य केले जाते आपण तिरंगा लोकशाही लोकशाही खतरे मे लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही संपलेली आहे, असे आपण आपल्या राज्यात देशात आपण एकमेकांशी बोलू शकतो. संवाद साधू शकतो तसेच भांडू शकतो. परंतु परदेशामध्ये जाऊन अशा प्रकारचे भाष्य करणे खरे म्हणजे आपल्या देशाची बेमानी करणे असेच आहे. आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आहे, असे सांगितले जाते. दरम्यान, लोकशाही नसती तर भारत जोडो यात्रा काढता आली असती का तसेच काश्मीरमध्ये तिरंगा फडकवता आला असता का, असा सवाल त्यांनी केला.
देशात लोकशाही :पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी 370 कलम हटवल्यामुळे तिरंगा फडकवण्याची संधी मिळाली. पूर्वी मला आठवते की, जेव्हा त्या ठिकाणी जाण्याची देखील परिस्थिती नव्हती. पंतप्रधानांनी देखील म्हटले की, जे होईल ते होईल पण तिरंगा यात्रा काढली. त्यावेळेस पंतप्रधान मोदींनी जाऊन तिथे तिरंगा फडकवला तेव्हाच संघर्षाचा काळ होता. तुम्हाला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांमुळे आज तिथे झाला जायला मिळाले. देशात लोकशाही आहे म्हणूनच तुम्हाला हे करता आले, असे टीकास्त्र त्यांनी राहुल गांधींवर डागले.
सर्वसामान्यांचे सरकार :मुंबईच्या विकासाला चालना देणार आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठा पाठिंबा मिळालेला आहे. आर्थिक ताकद दिलेली आहे शेवटी या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे. पायाभूत सुविधावर काम करणारे राज्य आपले या देशातले पहिल्या क्रमांकाचा राज्य असेल. पायाभूत सुविधा एवढे आपल्या सुरु आहे. त्यामध्ये जाऊ इच्छित नाही आणि म्हणून आजच्या तरुणांना काम मिळाले पाहिजे. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे, शेतकरी सन्मान योजना आपण केली, नमो शेतकरी सन्मान योजना केली व संघटित कामगारांना पुढे त्यांच्या मुलांना शिक्षण आरोग्य मिळाले पाहिजे, यासाठी आपण काम केले पाहिजे, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. स्वयंरोजगार मिळाला पाहिजे, हा निर्णय आपण घेतलेला आहे, आणि म्हणून हे सरकार जे आहे हे सरकार काम करणारे सरकार आहे, आणि परफॉर्म करणारे सरकार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.