मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तीन ईशान्येकडील राज्यांतील निवडणुकीच्या निकालाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असले, तरी कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल बदलाचे सूचक म्हणून दाखवत आहेत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पुणे शहरातील कसबा पेठेतील बालेकिल्ल्यात काँग्रेसकडून झालेला पराभव हे संपूर्ण देशात परिवर्तनाचे वारे वाहत असल्याचे संकेत देत असल्याचे पवार म्हणाले होते.
कसबा निकालानंतर ईव्हीएमवर शंका घेणार नाही : पवार निवडणुकीच्या निकालाकडे निवडकपणे पाहत आहेत. ईशान्य विभागातील तीन राज्यांच्या निकालाकडे ते दुर्लक्ष करत आहेत, मात्र कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाबाबत ते बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, मला आशा आहे की, पवार कसबा निकालानंतर ईव्हीएमवर शंका घेणार नाही. कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या आहेत.