मुंबई:भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) ने LVM-3 हे सर्वात वजनदार रॉकेट काल यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. इस्त्रोच्या या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath shinde यांनी ट्विट करत सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
काय म्हणालेत मुख्यमंत्री ? इस्रो या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने दिवाळीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक कामगिरी करत भारतीयांना मोठी भेट दिली आहे. इस्त्रोकडून रविवारी LVM 3 या सर्वात वजनदार रॉकेट द्वारे ३६ उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. सर्व शास्त्रज्ञांचे मनःपूर्वक अभिनंदन.
36 उपग्रह केवळ दळणवळणासाठी: काल दिवाळीच्या पहिल्या दिवशी इस्रोनं भारतीयांना दिवाळीची मोठी भेट देत LVM-3 या रॉकेटमधुन 36 उपग्रह वाहून नेले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून शनिवारी मध्यरात्री १२:०७ वाजता प्रक्षेपित करण्यात आले आहे. LVM-3 या बाहुबली रॅाकेटमधुन एका खाजगी कम्युनिकेशन फर्म वनवेबचे 36 उपग्रह वाहून नेले. पुढील वर्षाच्या पहिल्या सहामाहीत LVM-3 द्वारे 36 OneWeb उपग्रहांचा आणखी एक संच प्रक्षेपित केला जाईल. 36 पैकी 16 उपग्रह यशस्वीरित्या वेगळे करण्यात आले आहे.
36 उपग्रह केवळ दळणवळणासाठी उर्वरित 20 उपग्रह वेगळे केले जातील, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली आहे. हे 36 उपग्रह केवळ दळणवळणासाठी आहेत. या वर्षी पीएसएलव्ही आणि एसएलव्ही रॉकेटची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. LVM-3 पूर्वी या रॉकेटला GSLV मार्क रॉकेट म्हणूनही ओळखले जात होते. या मिशनसाठी 24 तासांचा काउंटडाऊन ठेवण्यात आला होता. या मिशनमध्ये ब्रिटिश स्टार्टअप वनवेबचे 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहे.