महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde : सीमा प्रश्न सुटेना! महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक - Maharashtra Karnataka border issue

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न रोज चिघळताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सह्याद्री अतिथी गृहात तातडीची बैठक बोलावली (CM Eknath Shinde called meeting) आहे. या बैठकीला सीमा भागातील सर्व आमदार खासदार आणि स्थानिक नेते उपस्थित असणार (meeting from Maharashtra Karnataka border area) आहेत.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Dec 2, 2022, 10:12 AM IST

Updated : Dec 2, 2022, 10:42 AM IST

मुंबई :महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न रोज चिघळताना पाहायला मिळत आहे. बेळगाव निपाणी कारवार सीमा भागातील या परिसराबाबत अधिक महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये वाद सुरू असताना कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सातत्याने या भागाबाबत विवादित वक्तव्य करत (CM Eknath Shinde called meeting) आहेत. सांगली आणि जत येथील काही गाव कर्नाटक राज्यात सीमा भागातील गाव येण्यासाठी तयार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. त्यातच गुरुवारी जत तालुक्यातील काही गावांना कर्नाटकने पाणी सोडले (meeting from Maharashtra Karnataka border area) आहे.

तातडीची बैठक :महाराष्ट्र सरकार सीमावरती भागातील गावांना सुविधा देत नाही. काही गावांनी महाराष्ट्रातून कर्नाटक जाण्याबाबत देखील इशारा दिला आहे. त्यामुळे सीमा भागाचा प्रश्न आता चिघळताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सह्याद्री अतिथी गृहात तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सीमा भागातील सर्व आमदार खासदार आणि स्थानिक नेते उपस्थित असणार (Maharashtra Karnataka border) आहेत.

कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद :कर्नाटकचे मुख्यमंत्री (CM Basavaraj Bommai)) सीमा भागाच्या मुद्द्यावरून दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी सर्वोच्च न्यायालयात कर्नाटक राज्याची बाजू मांडण्यासाठी त्यांनी विख्यात वकील मुकुल रोहतगी यांना नेमले आहे. मात्र सीमा भागातला प्रश्न कर्नाटकचे मुख्यमंत्री चिघळवत असताना महाराष्ट्रातले सरकार काहीही करत नाही, असा आरोप सातत्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून केला जात आहे. ज्याप्रमाणे मुकुल रोहतगी यांची नेमणूक कर्नाटकने केली, त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील प्रख्यात वकील हरीश साळवे यांची तातडीने महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी नेमणूक करावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारकडे केली होती. तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर शिंदे फडणवीस सरकारचे लक्ष नसून केवळ आपली खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली (Maharashtra Karnataka border issue) होती.

सरकार आता खडबडून जागे :जत तालुक्यात कर्नाटक सरकारकडून पाणी सोडण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकार आता खडबडून जागे झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी संध्याकाळी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी जतच्या 42 गावांच्या पाणी प्रश्नाबाबत तातडीची बैठक बोलावली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


एकाच योजनेला दोन वेळा मंजुरी :जत तालुक्यातील 42 गावांचा पाण्याचा प्रश्न सध्या पेटला आहे. पाणी द्यावे अन्यथा आम्ही कर्नाटक मध्ये जाऊ असा इशारा दिला होता. गावागावात कर्नाटकमध्ये जाण्याबाबत उठाव सुरू झाला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांचे पोस्टर झळकवून, झेंडे फडकावत, गावामध्ये दुष्काळग्रस्त रॅली काढून पाण्यासाठी कर्नाटक मध्ये जाण्याबाबत आक्रमक झाले होते. त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 42 गावांना पाणी देण्यासाठी आखण्यात आलेल्या म्हैसाळ विस्तारीत योजनेला तत्वतः मंजुरी दिली होती. मात्र 2019 मध्येच या योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जतमध्ये येऊन म्हैसाळ योजनेला तत्वतः मंजूरी दिली होती. त्यामुळे एकाच योजनेला दोन वेळा तत्वतः मंजुरी कशी ? या प्रश्नामुळे दुष्काळी जनतेत संम्रभम निर्माण झाला होता. तर दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराज यांचा नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त शिष्टमंडळाने मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी 42 गावांचा प्रश्न लवकरचं मार्गी लावून तहान भागवली जाईल, असे आश्वासन दिले होते.

कर्नाटक सरकारचे आभार :कर्नाटक सरकारने थेट जत तालुक्यातील सीमा भागात पाणी सोडले आहे. कर्नाटकच्या तुबची बबलेश्वर योजनेचा पाणी ओव्हरफ्लो करण्यात आले. जे पाणी गुरुवारी सायंकाळी तिकोंडी गावात पोहचले. ज्यामुळे तिकोंडी तलाव भरून वाहू लागला. यामुळे ग्रामस्थांमध्ये आंनद पसरला असून कर्नाटकच्या पाण्याचे स्वागत करत दुष्काळग्रस्त नागरिकांकडून कर्नाटक सरकारचे आभार मानत अभिनंदन करण्यात येत आहेत.


सरकारला पुन्हा डीवचण्याचा प्रकार :दुष्काळी भागात कर्नाटक सरकारकडून सोडण्यात आलेले पाणी म्हणजे, एका प्रकारे कर्नाटककडून महाराष्ट्र सरकारला पुन्हा डीवचण्याचा प्रकार असून कर्नाटक मधून जाण्यासाठी आग्रही असणाऱ्या गावांना आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकतो. हा एक प्रकारचा संदेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सिमाभागातील गावांच्या कर्नाटकमध्ये भावना अधिक तीव्र होण्याच्या शक्यता निर्माण झाली आहे.


बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा :या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 42 गावांच्या पाणी प्रश्नावर मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलवली आहे. सह्याद्री अतिथी गृहावर सायंकाळी 5.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार असून, या बैठकली प्रामुख्याने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, भाजपा खासदार संजयकाका पाटील, जतचे काँग्रेस आमदार विक्रम सावंत आणि सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी उपस्थित राहणार आहेत. तर बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते. मुख्यमंत्री शिंदे 42 गावांच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे आणि विशेषतः दुष्काळग्रस्त जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

Last Updated : Dec 2, 2022, 10:42 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details